शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न..
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न..
------------------------------------------------------------------------------मिरज : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविघालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी प्रमुख लेफ्टनंट दिगंबर नागर्थवार यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
यामध्ये एनसीसी छात्रानी व एनएसएस स्वयं सेवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यामध्ये एनसीसीच्या गेल्या वर्षीच्या सीनियर अंडर ऑफिसर तथा मीस सांगली रेवती फडके, दीपक काशीद, हेमंत निकम,
गुरुप्रसाद कुलकर्णी ,विशाल खंबे, विवेक चव्हाण, शाम कदम, ओंकार मदने, अशोक कागवाडे , संकेत पाटील, अभिषेक जाधव , पवन कारंडे, किशोर खामकर, प्रतीक नाईक, अक्षय धडस, हनुमंत व्हणमिसे ,प्रतीक जाधव, वैभव चव्हाण ,अनिकेत माने व मयूर काळे या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
यावेळी १२१ वेळा रक्तदान केलेले डॉ. रवींद्र फडके यांनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे असे आवाहन केले. रक्त संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच्याशी संलग्न असलेल्या सिव्हींल हॉस्पिटल मिरज येथील रक्तपेढीने केले. रक्त संकलन पथकाचे नेतृत्व डॉ. शेंडगे यांनी केले.
Comments
Post a Comment