साळुंखे महाविद्यालयातर्फे विवेकानंद व जिजाऊ जयंती.

साळुंखे महाविद्यालयातर्फे विवेकानंद व जिजाऊ जयंती.



------------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
राजू कदम
कुपवाड ग्रामीण
------------------------------------------------------------------------------
मिरज : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयातर्फे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्केटमध्ये केळी विकणाऱ्या महिलेचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी बुलेटवर  माजी सीनियर अंडर ऑफिसर तथा मिस सांगली रेवती फडके, प्राचार्य सतीश घाडगे, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट दिगंबर नागरथवार, प्रा. बनसोडे यांच्या  मार्गदर्शनाखाली या रॅलीमध्ये एनसीसी चे छात्र, एन एस एस चे विद्यार्थी , १०० प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. स्वामी विवेकानंद की जय, राजमाता जिजाऊ की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने परिसर दुमदुमत होता. 

बापूजी साळुंखे महाविद्यालयापासून निघालेली ही फेरी शिवाजी पुतळा मार्गे मिरज मार्केटमध्ये आली व बालगंधर्व मार्गे गोरे मंगल कार्यालयापासून आळतेकर हॉल मार्गे कमान वेस मार्गे बापूजी साळुंखे महाविद्यालय पर्यंत होती. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग हा मिरजकराना जाणवत होता.



 मिरजेतील ही पहिलीच रॅली असावी ज्यामध्ये १०० पेक्षा जास्त प्राध्यापक व प्राध्यापिकांचा सहभाग होता. 

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.