थट्टा मस्करी ने घडला जिवघेणा हल्ला ! फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन आरोपीस ठोकल्या बेड्या!
थट्टा मस्करी ने घडला जिवघेणा हल्ला ! फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन आरोपीस ठोकल्या बेड्या!
----------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर: - डोक्यात चेष्टेने टपली मारल्याच्या कारणावरून नागाळा पार्क मध्ये झालेल्या खूनी हल्ल्यात ओंकार कुमार भिंगारदिवे हा गंभीर जखमी झाला
या घटनेची पार्श्वभूमी आहे अशी की जखमी ओमकार कुमार भिंगारदिवे राहणार नवजीवन अपार्टमेंट नागाळा पार्क मुळगाव इंगरुळ तालुका बत्तीशिराळा जिल्हा सांगली व देवराज कांबळे राहणार रमनमळा हे दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत असून दिनांक 21 /01 /2023 रोजी मेरी वेदर ग्राउंड वर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवराज कांबळे व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या झालेला वाद मिटवून ओमकार याने देवराज कांबळेच्या डोक्यात टपली मारली.
टपली मारल्यावर देवराज कांबळे यांनी फिर्यादी ओमकार कुमार भिंगारदिवे यास तू टपली का मारली तू त्या मुलांच्या समोर मला टपली मारायला नको होती असे म्हणून आज तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान नवजीवन आपारमेंट नागाळा पार्क येथे धारदार चाकूने ओमकार च्या छातीवर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला
शाहूपुरी पोलिसांची दमदार कामगिरी आरोपींना 24 तासात ठोकल्या बेड्या!
या घटनेची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यास समजतात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तात्काळ या घटनेची तपास करण्याचे आदेश डीबी पथकास दिले त्या तपासाच्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे आरोपी देवराज कांबळे याला शिये फाट्यावर पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असताना शाहूपुरी डी बी पोलिसांच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सदर आरोपीस जेर बंद केले व त्यांच्या सोबत असलेल्या विधी संघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले आहे
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील हेड कॉन्स्टेबल ऋषिकेश पवार, युवराज पाटील, सागर माने, लखन पाटील, मिलिंद बांगर,शुभम सकंपाळ, दिग्विजय चौगुले यांनी केली
Comments
Post a Comment