आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

 आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. 


---------------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
---------------------------------------------------------------------------------

दिनांक 3 जानेवारीला 2023 ला आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे 192 वी  सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक, गुरुमुखी सर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या  ताराबाई वाडगुरे, आशा वर्कर अर्चना मोहुर्ले, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका,  साळवे मॅडम,  पिंपळकर मॅडम तथा ज्येष्ठ शिक्षक  खामनकर सर, शालेय मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री  अंकिता ताजने मंचावरउपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शाळेच्या शिक्षिका . अंजली हूलके मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शालेय मंत्रिमंडळाच्या शेजल शेलवडे हिने मानले. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील 10 विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली व मंचावरील सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.