कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. संजयसिंह चव्हाण यांचे शुभहस्ते ध्वजारोहण सकाळी ठिक 8.00 वाजता करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहनापूर्वी ग्राम विकास विभागाच्या सूचनेनुसार भारतीय संविधानाच्या उददेशिकेचे वाचन करणेत आले. ध्वजारोहण नंतर सर्व उपस्थितांनी तंबाखुमुक्तीची शपथ घेतली. या प्रसंगी जि.प. कर्मचारी कलामंच यांचेवतीने देशभक्तीपर गीत गायन करणेत आले कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे .जिल्हा परिषदेमधील शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्य मिळवल्याबददल एकुण 29 विदयार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणा-या 5 शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेहस्ते सत्कार करणेत आला. तसेच महिला व बालकल्याण विभागाकडील वैयक्तिक लाभार्थी योजनांतर्गत ओला मसाला मशीन श्रीम. मालुबाई एकनाथ शिंदे यांना धनादेश प्रदान करणेत आला. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने याच्या प्रचार प्रसिध्दी करीता तयार करण्यात आलेल्या स्टँडीचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांचे हस्ते करणेत आले.
याप्रसंगी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी.पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव , कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सागांवकर, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) अशोक धोंगे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास ) शिल्पा पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार , कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment