इंडस्ट्रियल असोशियन बामणोलीच्या वतीने ग्रामपंचायत बामणोलीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार व असोसिएशनच्या 2023 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न...
इंडस्ट्रियल असोशियन बामणोलीच्या वतीने ग्रामपंचायत बामणोलीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार व असोसिएशनच्या 2023 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न...
--------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी इंडस्ट्रियल असोसिएशन बामणोली यांच्या वतीने ग्रामपंचायत नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार व इंडस्ट्रियल असोसिएशन बामणोलीच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..
याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन अनंत चिमड यांनी केले..
सरपंच सौ. गीता सुभाष चिंचकर यांचा व महिला सदस्य यांचा सत्कार उद्योजिका सौ. अनुप्रिया चिमड व सौ. स्वरूपा ढेंगळे यांनी केला, उपसरपंच विष्णू लवटे यांचा सत्कार असोसिएशनचे सचिव संजय ढेंगळे व उद्योजक प्रकाश माने यांनी केला, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घुटुकडे यांचा सत्कार संचालक संजय गुंडपकर यांनी केला, सदस्य संतोष सरगर यांचा सत्कार संचालक बंडू घाडगे यांनी केला, भैरवनाथ पॅनलचे पॅनल प्रमुख सुभाष चिंचकर यांचा सत्कार चेअरमन अनंत चिमड व्हाईस चेअरमन सदाशिव मलगान व सर्व संचालक मंडळ यांनी केला..
याप्रसंगी उपसरपंच विष्णू लवटे, सदस्य संतोष सरगर, महिला सदस्य स्नेहल व्हणसुरे, संगीता पाटील अर्चना पाटील रूपाली यमगर अनिता जाधव मनीषा दुधाळ मालन गायकवाड या सर्वांचा सत्कार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला,
याप्रसंगी पॅनल प्रमुख सुभाष चिंचकर यांनी सर्व उद्योजक यांचे आभार मानले आणि त्याचबरोबर येणाऱ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण उद्योजकांना रस्ते गटारी पाणी यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी उपस्थित पत्रकार मित्रांचाही पत्रकार दिनानिमित्त सुभाष चिंचकर, प्रकाश घुटुकडे, विष्णू लवटे, संतोष सरगर यांचे हस्ते करण्यात आला.याप्रसंगी संचालक सज्जाद पाकजादे, संचालक अभिजीत गुजर, उद्योजक दिनेश सारडा, उद्योजक सुजित जाधव, उद्योजक संतोष चव्हाण, उद्योजक अभिजीत कदम, उद्योजक विवेक पाटील, उद्योजक अभिजीत घाडगे, उद्योजक संजय चिंचकर,उद्योजक जगन्नाथ माने, उद्योजक शितल आडमुठे, उद्योजक सतीश बिजरगी, उद्योजक दीपक व्हणसूरे व बहुसंख्या उद्योजक व्यापारी उपस्थित होते..
आभार इंडस्ट्रियल असोसिएशनचे सचिव संजय ढेंगळे यांनी मानले.
Comments
Post a Comment