आरोग्य निरिक्षक राजेंद्र पाटील व करण लाटवडेंना दंड.

 आरोग्य निरिक्षक राजेंद्र पाटील व करण लाटवडेंना दंड.

----------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी 

कु रजनी सचिन कुंभार

----------------------------------------------------------

कोल्हापूर ता.02 : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आरोग्य निरिक्षकांना शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचरा उठाव, डर्टी स्पॉटचे सौंदर्यीकरण, नाला/चॅनेल सफाई करणेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ती जबाबदारी त्यांनी दैनंदिन पार पाडणेची आहे. परंतु प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना फिरतीच्यावेळी ए-3 चे आरोग्य निरिक्षक राजेंद्र पाटील व ई-3 चे आरोग्य निरिक्षक करण लाटवडे यांच्या भागामध्ये दैनंदिन स्वच्छता व कचरा उठाव होत नसलेचे निदर्शनास आले. या आरोग्य विभागाकडील दोन आरोग्य निरिक्षक यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार दैनंदिन काम केले नसलेने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी करण लाटवडे यांना दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी व राजेंद्र पाटील यांना दि.18 नोव्हेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांच्याकडे विहित मुदतीत खुलासा मागणी केला होता. या दोघांचा खुलासा आल्यानंतर तो प्रशासकांनी अमान्य करुन त्यांना दंड ठोठावला आहे. यामध्ये आरोग्य निरिक्षक राजेंद्र पाटील यांना 2000/- रुपयांचा दंड तर आरोग्य निरिक्षक करण लाटवडे यांना 1000/- रुपयांचा दंड करण्यात आला.  सदरचा दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.