गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

 गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.


-----------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------

४,३८,५७०/- रुपयाचा मुद्दे माल जप्त !

मा. पोलीस अधीक्षक कोल्हापूर, यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी  सर्व पोलीस ठाण्याना त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अवैध व्यवसायाचा शोध घेवून कारवाई करणेचे काम सुरु आहे . 

दिनांक ०५/१२/२०२२ रोजी गोळुक शिरगांव गावी अर्जुन महादेव मिठारी यांचे मालकीचे इमारतीमध्ये विजय सतिश घळके यांने "गोकुळ कला क्रिडा व सांस्कुतिक मंडळ" नावाने क्लब सुरु करुन, त्यामध्ये बेकायदेशिर पत्याचे पानाचा पैसे लावुन जुगार व्यवसाय चालु असले बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना माहिती मिळाली त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकासह दिनांक ०५/१२/२०२२ रोजी 06.०० वा. छापा टाकुण कारवाई केली. 

सदर व्यवसायाचा मालक विजय सतिश घळके हा असुन त्याने जागा मालक अर्जुन महादेव मिठारी यांचेकडुन इमारत भाडे तत्वावर घेवून त्यामध्ये विजय घळके यांने "गोकुळ कला क्रिडा व सांस्कुतिक मंडळ” नावाने परवाना घेवुन त्यामध्ये बेकायदेशिरपणे पत्याचा पानाचा जुगार व्यवसाय सुरु केलेला होता. छापा कारवाईमध्ये १) गणेश नागेश पाटील, वय २५ रा. दौलतनगर कोल्हापूर २) अभिनंदन आनंदा पाटील, वय - ३१रा. मेन रोड गोकुळ शिरगाव, ३) शिवाजी गणपती शिरगांवे, वय ३२ रा. गाधी चौक कंदलगांव, ४) शिवाजी रामचंद्र पाटील, वय ६२ रा. सावर्डे ता.कागल, ५) नागेश शामराव शेळके,वय ४४ रा. कणेरीवाडी ता. करवीर, ६) आनंदा विलास आरते, वय ४८ रा. वडणगे ता करवीर, ७) संभाजी शंकर निर्मळे, वय - ४९ रा. कंदलगांव ता करवीर, ८) संजय वसंत वाकळे, वय ५० रा. नेर्ली ता. करवीर, ९) संजय सदाशिव पाडळीकर वय ५४ रा. शेवट बसस्टॉप उचगांव, १०)चंद्रकांत विश्वनाथ गडहिरे,वय ५२ रा. राजेंद्रनगर कोल्हापूर, ११) अविनाश ज्ञानोबा घोळवे, वय ३७ रा.कागल, १२)विकास आनंदराव संर्यवंशी वय ४६ रा. शिवाजीपेठ कोल्हापूर, १३) प्रताप हिन्दुराव नागराळे, वय ४५ रा. कोगनोळी ता. चिक्कोडी जि.बेळगांव, १४) दादासाो अंबादास माने वय - ५१ रा.उचगांव ,१५) कैलास महादेव खिल्लारे वय ३७ रा. वृदांवन कॉलनी आगाशिवनगर कराड, १६ ) दत्तात्रय गजानन काटकरवय -३८ रा. पोर्ले ता. पन्हाळा, १७) जिगनु सरवर बांटुगे वय ३७ रा.मोरेवाडी कोल्हापूर, १८) अल्लाउद्दीन रसुल नायकवडी वय ६६ रा. शिरोली पुलाची, १९) रविंद्र महादेव चव्हाण, वय ३६ २१) संतोष बाजीराव रा.राजारामपुरी कोल्हापूर, २०) नितीन बाबुराव मर्दाने, वय ४७ रा.कागलं वारके, वय ५३ रा. कणेरीवाडी, २२) मुकेश नवलकिशोर सिंग वय ४१ रा. कणेरी ता करवीर यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन २,०८७७०/- रोख रक्कम २२ मोबाईल हॅन्डसेट व तीन मोटर सायकली इतर जुगार व्यवसायाचे साहीत्य असा एकुण ४,३८,५७० /- रुपयाचा मुद्दे माल हस्तगत केलेला आहे. सदर जुगार व्यवसायाचा मालक २३) विजय सतिश घळके हा असुन सदर व्यवसाय सुरु असले जागेचा मालक २४) अर्जुन महादेव मिठारी हा आहे. एकुण २४ आरोपीत यांचे विरुध्द पोलीस अमंलदारा सोमराज पाटील यांनी दिले फिर्यादी प्रमाणे गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेस कायदेशिर गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. 

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यांचे मागर्दनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, सहा फौजदार हरिष पाटील, पोलीस हवलदार प्रकाश पाटील, संजय पडवळ, संदिप कुंभार, अर्जुन बंद्रे, राजेंद्र वरंडेकर, व पोलीस अमंलदार सोमराज पाटील यानी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.