Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारिता करिअरचा नवीन चांगला पर्याय : शिवाजी होडगे.

पत्रकारिता करिअरचा नवीन चांगला पर्याय : शिवाजी होडगे.

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

हल्लीच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारिता हा करिअर साठी खूप महत्त्वाचा व चांगला पर्याय आहे त्याचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करावा व ग्रामीण पत्रकारिते सारखा अभ्यासक्रम  शिकून पत्रकारिता कशी करावी, त्याची नियमावली शिकून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा असे मत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांनी व्यक्त केले. ते दूधसाखर महाविद्यालय,बिद्री येथे शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त आणि मराठी विभाग आयोजित ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाच्याउद्घाटनाच्या वेळी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते.   डॉ. होडगे पुढे म्हणाले, पत्रकारिता म्हणजे काय? त्यासाठी कोणती नियमावली आहे ?समाज व पत्रकारिता यांचा कसा जवळचा संबंध आहे ?यासंबंधी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाला मुरगुड परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक   गावमाया कथासंग्रहाचे लेखक श्री .भैरवनाथ डवरी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी  साहित्य आणि पत्रकारिता यांचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्या अनुभवातून  विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच पत्रकार श्री. टी.एम. सरदेसाई यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख समन्वयक प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी करून दिली .  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. प्राची चौगले हिने तर आभार कु. शिवानी पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाला  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सह समन्वयक डॉ.एस ए.साळोखे  डॉ.एन. डी.पाटील,डॉ. सी. वाय.जाधव,डॉ.एल.एस. करपे, प्रा. ए.बी. माने, प्रा.सुहानी पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री.एस.के.पाटील ,पत्रकार श्री. दत्तात्रय वारके, श्री. बाबासो पोवार यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय अधिकारी ,कर्मचारी व  विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments