अमरावती रेल्वे स्थानकावर मुंबई दक्षता पथक रेल्वे यांचे धाडसत्र तीन तिकीट निरीक्षणविरुद्ध कारवाई.
अमरावती रेल्वे स्थानकावर मुंबई दक्षता पथक रेल्वे यांचे धाडसत्र तीन तिकीट निरीक्षणविरुद्ध कारवाई.
-----------------------------------------------------
मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या दक्षता पथकाने दोन तिकीट निरीक्षकाकडे अतिरिक्त रक्कम तर एकावर कायदेशीर कारवाई अमरावती रेल्वे स्थानकावर करण्यात आली या कारवाईमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे आणि नांदुरकर (अमरावती) रत्नेश तिवारी (बडनेरा) ए आर खान (मुर्तीजापुर) या तिन्ही तिकीट निरीक्षकावर मुंबई दक्षता पथकाने रेल्वे नियमानुसार कारवाई केली आहे प्राप्त माहितीनुसार मुंबई रेल्वे दक्षता पथकाचे प्रमुख तीन अधिकारी यासह सागर असे एकूण नऊ जण 2८ नंव्हबर रोजी मुंबई एक्सप्रेस मध्ये प्रवास करीत होते धावत्या गाडीत या दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असलेले तिकीट निरीक्षणाच्या हालचाली टिपल्या प्रवाशासोबत आर्थिक व्यवहार आरक्षण बर्थ देताना पैशाची डिमांड असे अनेक निरीक्षण या दक्षता पथकाने नोंदविले अमरावती येथे गाडी येतात दक्षता पथकाने मुख्य तिकीट तपासणी निरीक्षकांचे कार्यालय गाठले दरम्यान तिकीट निरीक्षक आरडी नांदुरकर आणि रत्नेश तिवारी हे कार्यालयात येतात दक्षता पथकाने या दोघांची झाडाझडती घेतली तेव्हा नांदुरकर यांच्याकडे पाच हजार रुपये तर तिवारीकडे अडीच हजार रुपये आढळले तिकीट निरीक्षक कर्त्यावर असताना त्यांच्याकडे रकमेची नोंद कार्यालय ठेवावी लागते मात्र या दोन्ही तिकीट निरीक्षकाकडे दक्षता पथकाने राबविले असता अतिरिक्त रक्कम आढळण्याचा ठपका ठेवला आहे.
तसेच तिकीट निरीक्षक ए आर खान हे अमरावती मुख्यालय येण्यापूर्वीच मुर्तीजापुर येथे उतरल्यामुळे त्यांच्या रेल्वे नुसार कारवाई करण्यात आली नांदूरकर आणि तिवारी यांनी कर्तव्यावरून परतल्यानंतर अमरावती रेल्वे स्थानकावरील बुकिंग ऑफिसमध्ये रक्कम जमा केल्यानंतर दक्षता पथकाने गाव सत्र राबविण्याची माहिती आहे दक्षता पथक प्रवासी म्हणून आले होते मुंबई येथील रेल्वेचे दक्षता पथक हे अमरावती एक्सप्रेस मध्ये प्रवासी बनून आले होते त्यांच्यासोबत सुरक्षा यंत्रानेही देखील सिविल मध्ये होते असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आता कारवाईची पुढील सूत्र मुंबईतून हलणार आहेत. सकाळी नऊ वाजताच्या पूर्वीच दक्षता पथकाने कारवाई केली आमचे प्रतिनिधी दहा वाजता पोहोचले तेव्हा कारवाई आटोपली होती तीन तिकीट निरीक्षकांविरुद्ध कारवाई झाली असून पंचनामेवार प्रवाशांचे सुद्धा स्वाक्षरी घेण्यात आली सदर माहिती संजय अमीन मुख्य तिकीट अधिकारी अमरावती यांनी दिली.
Comments
Post a Comment