अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा.

 अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा.

----------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
प्रतिनिधी/नागपूर
----------------------------------------------------------------

अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने बर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाल्याने बर्डी येथीलच लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलांवर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. हर्ष देशमुख यांनी दिली. या मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. परंतु आता मुले ओके आहे, असे डाॅ. देशमुख यांनी सांगितले.  

या मुलांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चाॅकलेट वाटल्याचे समोर आले आहे. चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. कोणी वाढदिवशी वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल असे पोलिसांनी सांगितले.








Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.