बेलवळे खुर्द प्राथमिक शाळेस माजी सैनिकांच्या कडून स्टेरिओ सेट भेट .

 बेलवळे खुर्द  प्राथमिक शाळेस माजी सैनिकांच्या कडून स्टेरिओ सेट  भेट .

-------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 
प्रतिनिधी 
युवराज वाईंगडे
-------------------------------------------------------------------
दि 19.12.2022 रोजी विद्यामंदिर बेलवले खुर्द तालुका कागल शाळेस स्टेरिओ बॉक्स व माइक सेट माजी सैनिकांच्या कडून भेट म्हणून देण्यात आला आजच्या ई लर्निंग च्या युवा मध्ये वाद्य वर्गामधील सजावट विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे वेगवेगळ्या सूचना या सर्वांची माहिती देण्यासाठी निश्चितच या स्टेरिओ बॉक्स चा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना होईल तसेच बेलवले खुर्द गावच्या नूतन सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सरपंच सौ सुप्रिया पाटील व डे.सरपंच छाया जाधव यांचा सत्कार पूनम पाटील मॅडम व गीता खोत मॅडम यांच्या वतीने करण्यात आला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजुगडे सर यांनी केले आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले माझी सैनिकांचे कार्य देशासाठी खूप गौरवास्पद असते त्याचबरोबर त्यांनी आमचे विद्यार्थ्यांना दिलेली ही अनोखी भेट आम्ही सर्वजण आनंदाने स्वीकारतो व त्याचा योग्य ती उपयोग करून मुलांना त्याचा फायदा होईल

याचबरोबर मारुती कांबळे साहेब फौजी ज्योतीराम पाटील सर युवराज वाईंगडे सर यांची मनोगते झाली कार्यक्रमास उपस्थित. बापू जाधव मारुती कांबळे, तानाजी पाटील, नाना पाटील, शांताराम पाटील, रामचंद्र पाटील, धैर्यशील पाटील, संदीप पाटील,शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष विठ्ठल पाटील , मुख्याध्यापक राजुगडे सर, पूनम पाटील ,हिंगे सर ,पाटोळे सर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गीता खोत मॅडम व आभार फास्के सर यांनी मांडली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.