Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतचा आढावा.

 पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतचा आढावा.

-------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

 रजनी सचिन कुंभार

 कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी

-------------------------------------------------

 प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका तसेच कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्था यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतच्या अनुषंगाने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती घेतली व या विषयाचा अभ्यास करुन पुढील काळात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.

सर्किट हाऊस येथील सभागृहात आयोजित कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार राजेंद्र यड्रावकर, मित्रा चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे ॲड. बाबा इंदुलकर, आर. के. पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबत नागरिक व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेतली. तसेच कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडूनही हद्दवाढीच्या अनुषंगाने महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. या सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून हद्दवाढ बाबत सकारात्मक उपाय काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, यासाठी पुन्हा स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी ॲड. बाबा इंदुलकर, आर.के. पवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी हद्दवाड बाबत सविस्तर माहिती पालकमंत्री महोदयांना देऊन कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबतचा निर्णय शासन स्तरावर पाठपुरावा करुन घ्यावा, अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments