तारळे खुर्द येथे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छुपा प्रचार सुरू!
तारळे खुर्द येथे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छुपा प्रचार सुरू!
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कसबा तारळे प्रतिनिधी
विकास सरावणे
-----------------------------------
राधानगरी:- तारळेखुर्द ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवाराकडून छुप्या प्रचार मोहीमेस आरंभ केल्याचे चित्र गावातून दिसत आहे .
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तारळे खुर्द येथे दुरंगी लढत झाली होती.त्याच धर्तीवरती याहीवर्षी त्याच प्रकारेच गटबंधन राहिले असून दोन गटांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे .दोन्ही गटाकडून उमेदवारांचे फॉर्म भरण्यात आले असून आज माघारीच्या दिवशी कोण माघार घेणार कोणाचे फॉर्म टिकणार याकडे गावचे लक्ष लागले आहे .
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी सरपंच विश्वास पाटील व अन्य इतर गट आणि शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील व नेताजी चौगुले यांचा गट यांच्यामध्ये लढत झाली होती .
मागील वेळी अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये माजी सरपंच विश्वास पाटील यांच्या नियोजनानुसार ऍड. बी आर पाटील गट ज्येष्ठ नेते सदाशिव पौंडकर गट आणि विष्णूपंत पाटील गट या आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार आनंदा पाटील हे अगदी थोडक्या मताने निवडून आले होते.
मागील वेळी वरील चार गटाविरोधी शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील आणि काँग्रेसचे युवा नेते नेताजी चौगुले यांचा गट यांच्यामध्ये सरळ सरळ लढत झाली होती.गावातील चार गट एकत्र असल्याने एकतर्फी निकाल लागेल अशी चर्चा चालू असतानाच आलेल्या निकालाने गावामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती .यामध्ये विरोधी आघाडीला दोन सदस्य पद मिळवण्यात यश आले होते तर थेट सरपंच पदापासून अवघ्या काही मतांनी त्यांना हार पत्करावी लागली होती .यावर्षीचे चित्र पाहता सत्ताधारीगटाकडून मोर्चे बांधणीसाठी चांगलीच कंबर कसलेली दिसत असून विरोधी आघाडीकडूनही मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न होत असल्याचे चित्र गावातून दिसत आहेत.
यावर्षी सत्ताधारी गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून विरोधी आघाडीकडून जबरदस्त व्युहरचना केल्याची चर्चा गावामध्ये दिसून येत आहे .यामुळे मागील वर्षी अवघ्या काही मताच्या फरकामध्ये झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी विरोधी आघाडीने चांगलीच कंबर कसल्याची चर्चा दबक्या आवाजात चालू असल्याचे चित्र दिसत आहे.
Comments
Post a Comment