उंचगाव ग्रामस्थानी लोकवर्गणी काढून उभा केलेला उमेदवार सतिश मर्दाने !
उंचगाव ग्रामस्थानी लोकवर्गणी काढून उभा केलेला उमेदवार सतिश मर्दाने !
उंचगाव :- प्रचाराचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक असताना सरपंचपदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत उंचगाव येथे ऐन थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापलं आहे
थेट सरपंच पदाच्या उमेदवारांसह सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी ही प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.
अश्याच लोकनियुक्त सरपंच पदासाठी भाजप प्रणित आघाडी तर्फे लोकवर्गणीतून सतीश मर्दाने उभारले आहेत.
सतीश मर्दाने हे उच्चशिक्षित उमेदवार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सतीश मर्दाने यांची जडणघडण झाली. अशा कठीण परिस्थितीवर मात करत मर्दाने यांनी एम. ए. शिक्षण पूर्ण केले.
निवडणुकीत मत मिळवण्यासाठी प्रसंगी मतदारांना पैसे वाटले जातात. पण कोल्हापुर जिल्ह्यातील उंचगाव येथे सध्या उलट चित्र पाह्यला मिळतं आहे. येथे मतदारच एक प्रतिकूल परिस्थितीत लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवारी साठी आर्थिक मदत करत आहेत.
अत्यंत साध्या मातीच्या घरात राहणार्या मर्दाने याना उमेदवारी दिल्याने सगळ्यांनीच त्यांना मदतीचा हात देऊन निवडून देण्याचा शब्द दिला आहे.
गावच्या विकासाचा नवीन आराखडा महापूर व कोरोनाच्या काळात त्यांनी ग्रामस्थांना केलेली मदत युवकांची बेरोजगारी सोडवण्याकरिता नवीन ध्येय असे मुद्दे त्यांनी घेऊन स्वतः सरपंच पदावर दावा करीत मतदारांच्या समोर आपली भूमिका मांडत आहेत, कोणी कितीही आणि कसलेही आरोप आमच्यावर केले तरी त्याला सक्षमपणे तोंड देण्याची आमची तयारी असल्याचे त्यांच्या निकटवर्ती यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
उंचगाव ग्रामस्थांमध्ये सरपंच पदासाठी सतीश मर्दाने हाच उमेदवार निवडून येणार आणि मोठ्या फरकाने निवडून येणार असे दबक्या आवाजात उंचगाव मधील ग्रामस्थ बोलत आहेत.
सरपंच पदासाठी एकूण 5 उमेदवार रिंगणात उतरले असून एकूण मतदान 21,400 इतके असून खरी लढत भारतीय जनता पार्टीच्या सतीश मर्दाने व महाविकास आघाडीच्या मधुकर चव्हाण यांच्यातच होणार असल्याचे चित्र दिसत आहे
उंचगाव ग्रामस्थांमध्ये नामदेव वाईगडे यांना मानणारा ग्रामस्थवर्ग असल्याने सतीश मर्दानी यांचा भरघोस मतांनी विजयी होण्याचा संभव आहे.
---------------------------------------
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सरपंच पदाचे उमेदवार सतिश मर्दाने यानी असे सांगितले कि उचगाव मध्ये शासकीय बँक नाही ति मि उचगाव मध्ये आणण्याचा प्रयत्न करीन.महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देईन. रस्ते गटारे स्वच्छ राहतील
रोगराई पसरु देणार नाही. उंचगाव ग्रामपंचायत मधून मुबलक पाणी उपलब्ध करून देईन उंचगावचा विकास हेच माझे ध्येय राहिल. आपल्या दारी येऊन आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली
उंचगाव मधील ग्रामस्थ यांनी लोकवर्गणी काढून माझी उमेदवारी जाहीर केली आहे त्याच्या विश्वासास मि तडा जाऊ देणार नाही असा मि शब्द देत आहे असे आम्हाला सांगितले.
----------------------------------------
पथनाट्य, डिजिटल प्रचार, बॅनर बाजी, वैयक्तिक गाठीभेटीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतातहेत. त्यामुळे या गावांमधील वातावरण ढवळून निघालंय.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संपलेल्या जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीसाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Comments
Post a Comment