Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण येथील कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे ,संचलित न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण येथे पार पडला विज्ञान मेळावा.

 शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण येथील कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे ,संचलित न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण  येथे  पार पडला विज्ञान मेळावा.

-----------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------

शाहूवाडी:कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे ,संचलित न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण तालुका शाहूवाडी येथे दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी  विज्ञान मेळावा संपन्न झाला

 या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक कुंभी बँक कुडित्रेचे चेअरमन, गोकुळ दूध संघ कोल्हापूर चे विद्यमान संचालक माननीय अजित नरके साहेब अध्यक्षस्थानी होते तसेच युवा नेते राजवीर नरके साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थेचे प्रशासन अधिकारी माजी प्राचार्य बी आर अकिवाटे सर, डी.सी.नरके विद्यानिकेतनचे प्राचार्य ए.एम.पाटील सर,बंडा पाटील सर,मिसाळ सर व भागातील सर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते विज्ञान मेळाव्यात 90 उपकरणांची मांडणी करण्यात आली होती मेळाव्याचे  परीक्षणाचे काम शाहुवाडी विज्ञान संघाचे अध्यक्ष डी. टी. सुतार सर व सचिव बी एम कुंभार सर यांनी केले या कार्यक्रमांमध्ये शाळेचे विज्ञान शिक्षक बाडे सर,एस.पी.सर,तुरुंबेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विज्ञान उपक्रमांची मांडणी केली तर विज्ञान रांगोळी स्पर्धा साठी मगदूम सरांचे तर खाद्य स्टॉल साठी अमित पाटील सर व संतोष पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सर भारती पाटील मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक बाडे सर तसेच मुख्याध्यापक बाऊचकर सर प्रमुख पाहुणे युवा नेते राजवीर नरकेसाहेब, अकिवाटे सर,ए.एम. पाटील सर ,ऱ्हाटवटसर यांचे मार्गदर्शन झाले .शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजित नरके साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान उपकरणांमध्ये प्रथम क्र. प्रतीक पाटील द्वितीय क्र. संभाजी पाटील,दिगंबर तराळकर तृतीय क्र. अनमोल राऊत  व रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्र स्नेहल मोकाशी मयुरी पाटील, द्वितीय क्र तेजस्विनी पाटील ,निशिगंधा दळवी,मयुरी दाभोलकर तिसरा क्र मयुरी पाटील चांदना पाटील  या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विज्ञान नाटिका स्वागत गीत विज्ञान गीत सादर करण्यात आले .पाहुण्यांच्या चहापान्याची व्यवस्था बाळू पाटील काका आणि संदीप काका यांनी पाहिली.`

Post a Comment

0 Comments