इंदिरा गांधी योजनेचे केंद्र सरकारकडून प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा.

इंदिरा गांधी योजनेचे केंद्र सरकारकडून प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा.


----------------------------------------------------------------------------------   

----------------------------------------------------------------------------------   

कागलमध्ये राष्ट्रवावदी काँग्रेस पार्टीची मागणी......                        

आमदार हसनसाहेब मुश्रीफ आणि गोरगरीब लाभार्थ्यांचे नाते अतूट.......         

कागल, दि. ३०:इंदिरा गांधी योजनेचे केंद्र सरकारकडून दरमहा दोनशे रुपयांप्रमाणे गेल्या आठ ते नऊ महिन्याचे प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा, अशी मागणी कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. संजय गांधी योजना समितीचे माजी अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली  नायब तहसीलदार सौ. अर्चना कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. 

                

निवेदनात म्हंटले आहे, इंदिरा गांधी योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अशा लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये अनुदान मिळते. परंतु, गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून या लाभार्थ्यांना राज्य सरकारचे दरमहा आठशे रुपये मिळत आहेत. केंद्र सरकारकडून जमा होणारे दरमहा दोनशे रुपये प्रलंबित आहेत. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करावी, अशी मागणी केली आहे.

        

निवेदनात पुढे म्हटले आहे, लाभार्थ्यांना जादा अनुदान मिळवून देतो असे खोटे सांगून, लाभार्थ्यांची खाती केडीसीसी बँकेतून इतर बँकेकडे वर्ग करण्याबाबतही काहीजण अर्ज  भरून घेत आहेत. या लाभार्थ्यांनी अनुदान कायमस्वरूपी केडीसीसी बँकेतच मिळणेबाबत अर्ज सादर केलेले आहेत. रिझर्व बँकेच्या नियमानुसार व निकषाप्रमाणे हे  अनुदान केडीसीसी बँकेतील लाभार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग केले जाते. परंतु; लाभार्थ्यांना दिशाभूल करून व त्यांच्यामध्ये गैर पसरवणाऱ्यांचीही त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी निवेदनात माहिती

"हे चालू देणार नाही.........."

यावेळी बोलताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, आमदार हसनसाहेब  मुश्रीफ आणि निराधार योजनांच्या लाभार्थ्यांचे नाते आत्मीयतेचे आणि अतूट आहे.  या योजनांमध्ये असलेल्या अनेक अडचणी आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी दूर केलेल्या आहेत. त्यामुळेच कुणी काहीही अपप्रचार केला आणि काहीही सांगितले तरी या योजनांचे लाभार्थी मुश्रीफसाहेबांच्या प्रेमापासून दूर जाणार नाहीत. राज्यातील सत्ता बदलानंतर कागल तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या कार्यालयामध्ये काही लोकांचा सुळसुळाट झाला आहे. नियमबाह्य कामे करून घेण्यासाठी हे लोक दबाव टाकत आहेत. हे चालू देणार नाही, असा इशाराही श्री. माने यांनी दिला.    

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते, नवाज मुश्रीफ, विवेक लोटे, प्रवीण काळबर, संजय ठाणेकर, सुनील माळी, सुनील माने, राजू आमते, पंकज खलिफ, कुमार पिष्टे, शानुर पखाली, इरफान मुजावर, विक्रम जाधव, सुनील कदम, राहुल चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.

कागल: इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे केंद्र सरकारकडून दरमहा दोनशे रुपयांप्रमाणे गेल्या आठ ते नऊ महिन्यांचे अनुदान तात्काळ द्या, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार सौ. अर्चना कुलकर्णी यांना दिले 

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.