तुकाराम मुंढेची बदली रद्द करून जनभावनांचा आदर करावा.

 तुकाराम मुंढेची बदली रद्द करून जनभावनांचा आदर करावा.

--------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  
स्वप्निल देशमुख
---------------------------------------------------------------------

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मागणी

बुलढाणा ; जनतेच्या मुलभूत गरजांशी निगडीत असलेल्या यंत्रणांमध्ये सुधारणा घडवून सुलभ जनसेवेचे फलीत पदरात पाडून घेण्यासाठी प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी असणे गरजेचे आहे. ही वास्तवता लक्षात घेऊन आरोग्यसेवेतील कामचुकार, भ्रष्ट, अप्रामाणिक आणि नियमांचे उल्लंघन करून काळे धंदे करणार्‍या काही आरोग्य अधिकार्‍यांना ठरलेली अडचण म्हणून आयुक्त तुकाराम मुंढे यांची झालेली बदली रद्द करावी. अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेली आहे.

तुकाराम मुंढे हे आरोग्य सेवेत आल्यापासून अनेक बदल होण्यास प्रारंभ झाला. त्यांनी अनेक तक्रारींची दखल घेतल्याने जिल्हा रुग्णालयात नियमित सेवा देणारे आणि ग्रामीण भागातील प्राथमिक स्वास्थ केंद्रात मुख्यालयी हजर न राहणार्‍या कामचुकार अधिकारी कर्मचार्‍यांच्या वर्तनात बदल झाले होते. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख यांनी बुलडाणा जिल्ह्यात जनतेच्या आरोग्याला निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीच्या केलेल्या तक्रारींची  मुंढे यांनी त्वरीत दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले होते. आरोग्य सेवेमध्ये सुलभता आणि आमुलाग्र बदल घडविण्यात सक्षम असणार्‍या तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करुन त्यांना परत आरोग्य विभागात स्थानापन्न करावे. हा निर्णय म्हणजे राज्यातील जनतेच्या भावनांचा आदर ठरणारा आहे. अशी मागणी आणि हितावद सुचना संजय एम. देशमुख यांनी पाठविलेल्या पत्रातून केल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.