Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

एलआयटीच्‍या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्‍याचे आज 24 डिसेंबर रोजी उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती.

 एलआयटीच्‍या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्‍याचे आज 24 डिसेंबर रोजी उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती.


------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नागपूर, प्रतिनिधी
-------------------------------------------------------------------

लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) च्‍या दोन दिवसीय जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्‍याचे (ग्‍लोबल अॅल्‍युमनी मीट - 2022) उद्घाटन शनिवार, 24 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत होणार आहे. लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी परिसर, अमरावती रोड येथे होणा-या या कार्यक्रमाला राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची विशेष उपस्‍थ‍िती राहील. 

‘वन ड्रीम, वन टीम’ या संकल्पनेवर आधारित या ग्लोबल अॅल्युमनी मीट - 2022 चा मुख्‍य उद्देश एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (LITAA) च्‍या माध्‍यमातून सक्रिय व समर्पित माजी विद्यार्थी नेटवर्क तयार करणे, हा आहे. दोन दिवसांच्या या मेळाव्‍यात लिटाअरोमा, ऑरगॅनिक इंडिया आणि फायर चॅट सेंटर ऑफ एक्सलन्स, ज्वेल ऑफ एलआयटी आणि यूथ आयकॉन ऑफ एलआयटी पुरस्कार, ‘लिटा संवाद’ या विशेषांकाचे प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा समावेश राहील. 

कार्यक्रमाला आजी, माजी विद्यार्थ्‍यांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्‍यक्ष माधव लाभे, माजी अध्‍यक्ष अजय देशपांडे, ग्‍लोबल अल्‍युमनी मीटचे प्रमुख रमेश तराळे व एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments