सार्वत्रिक पंच वार्षिक निवडणूक 2022 उंचगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1
सार्वत्रिक पंच वार्षिक निवडणूक 2022 उंचगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1
----------------------------------------------------------------------------उचंगाव :-ग्रामपचायतीमध्ये आता प्रचारात रंगत येऊ लागली आहे गल्लोगल्ली उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत परंतु खरी लढत हि भा ज प व काँग्रेस या दोन पक्षांमध्ये दिसत असली तरी प्रभाग क्रमांक 1 मध्यें सर्व साधारण महिला उमेदवार गटातून मा सौ प्रतिभा संदिप जाधव यांची उमेदवारी दोन्ही प्रमुख पक्षांना घातक ठरताना दिसत आहे
प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे 1) अनिल आनंदराव दळवी हे विजयी होण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यानी जिल्हा परिषद फंडातून काँक्रिटकरण व बोअर पाईप लाईन प्रभाग क्रमांक 1 मध्ये केलेलीं आहेत माजी आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून शिंदे कॉलनी संपूर्ण परिसर नेमाडे कॉलनी भाजी मंडई छावा ग्रुप जय महाराष्ट्र घारे गल्ली या परिसरामध्ये दोन हायमॅक व पाण्यासाठी पाईपलाईन इथे सुविधा उंचगाव ग्रामपंचायत मध्ये केलेले असून या कामाच्या जोरावर अनिल आनंदराव दळवी यांचा विजय निश्चित मानला जात आहे अनिल आनंदराव दळवी यांचे शिक्षण बारावी झाले असून ते राजकीय क्षेत्रात वीस वर्षे कार्यरत आहेत त्यांनी ओपन पुरुष गटातून उमेदवारीचा अर्ज भरला आहे
प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपकडून संदीप शिवाजी कुंभार यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले असून ते कुशल कारागीर गेली अकरा वर्षे सार्वजनिक कामात अग्रेसर असून लॉकडाऊन मध्ये जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यशील होते गेले अकरा वर्षे सार्वजनिक होळी ला फाटा देऊन मिळालेले शेणी ग्रामपंचायतीस दान देत आहेत सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणाऱ्या व लोकांचा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठीशी असल्यामुळे संदीप शिवाजी कुंभार यांचा विजय निश्चित मानला जात आहे
सर्वसाधारण महिला गटातून रोहिणी श्रीकांत पाटील या उभ्या असून त्या उच्चशिक्षित असून राजकीय वाटचालीस सुरुवात करत आहेत , वरील तिन उमेदवार जर निवडून आले तर सामाजिक कार्यकर्ते एन डी उर्फ नामदेव वाईगडे यांनी केलेल्या कामाची पोचपावती उचगाव ग्रामस्थांनी दिली असं होईल कारण कित्येक वर्षे गावतळ्यात घाणीचे साम्राज्य पसरले होते ते गावतळे स्वच्छ करुन त्यामध्ये मासे सोडले पदरमोड करून वयस्कर मंडळी साठी बाकडी बसवली गावतळ्यात बोटींग करण्यासाठी बोट सोडली आहे पादचारी मार्गातील काँक्रिट ब्लॉक बसवले आहेत मोफत रुग्ण वाहीकेची सेवा संदीप पाटील यांच्या मदतीने विनामोबदला रात्रंदिवस अविरतपणे सुरू आहे या सेवेचा आजतागायत हाजरो ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे, बांधकाम कामगारांना मोफत संरक्षण किटचे वाटप केले आहे श्रम कार्ड अल्प दरात वाटप केले आहे त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे
काँग्रेस तर्फे 1)राहुल मोळे 2)सौ.सुनिता मधुकर चव्हाण व प्रकाश किरण गुमाने यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी अर्ज भरला आहे
Comments
Post a Comment