गांधीनगरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 15 जण जखमी.

 गांधीनगरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 15  जण जखमी.

----------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------

व्यापारी पेठेत भीतीचे वातावरण

गांधीनगर:-गांधीनगर मध्ये पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी 15 जणांचा  चावा घेऊन जखमी केले.  या जखमींवर गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचार करण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे गांधीनगरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी साडेदहाच्या सुमारास घडली.

गांधीनगर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ठिकठिकाणी मध्यवस्तीत कचराकुंड्या असल्याने त्या ठिकाणी कुत्र्यांची झुंडच्या झुंड पहावयास मिळतात. मसोबा माळ येथे असणाऱ्या कचरा डेपोवर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील दोन कुत्री पिसाळून त्यांनी गांधीनगर मधील मेन रोड, कोयना कॉलनी, पाच बंगला परिसर, शिरू चौक, या ठिकाणी रस्त्यावर थांबलेल्या आणि फिरस्त्या नागरिकांना चावून जखमी केले. ही घटना ग्रामपंचायत प्रशासनाला कळताच कोयना कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते स्टीफन बिरांजे, आणि ग्रामपंचायतीचा कर्मचारी सुकुमार घाडगे यांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे बाजारपेठेत खळबळ उडाली. यापूर्वीही नागरिकांना आणि लहान मुलांना कुत्री चावण्याच्या घटना अनेक  वेळा घडलेल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे गांधीनगरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

दरम्यान या घटनेविषयी गांधीनगर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी जखमेवर वसाहतु रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत आणि भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून त्यांना वन विभागात स्वाधीन करण्याची मोहीम सुरू करण्यात येईल असे 

गांधीनगर पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी फिरस्तत्यांना चावून जखमी केले. जखमींवर वसाहत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.