Posts

Showing posts from December, 2022

संत रोहिदास विकास फाउंडेशन तर्फे नागरिकांसाठी नोंदणी मेळावा संपन्न.

Image
 संत रोहिदास विकास फाउंडेशन तर्फे नागरिकांसाठी नोंदणी मेळावा संपन्न. --------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------- संत रोहिदास विकास फाऊंडेशन तर्फे, सौ.रुपाली कारंडे यांच्या विशेष प्रयत्नातून कुपवाडमध्ये रोहिदास समाज महादेव मंदीरात नागरिकांसाठी नोंदणी मेळावा २९/१२/२०२२ व  ३०/१२/२०२२ रोजी आयोजित केला होता.    नोंदणीचे प्रकार 1)आयुष्मान भारत योजना कार्ड  2) ई. श्रम कार्ड नोंदणी  3) बांधकाम कामगार योजना  4) नवीन मतदान नाव नोंदणी व दुरुस्ती. इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले जवळजवळ १००० आयुष्यमान कार्ड, ८०० हेल्थ कार्ड (आभा कार्ड ), ३०० श्रम कार्ड, १५० बांधकाम कामगार योजना नोंदणी , १५० मतदान नोंदणी करण्यात तरी भरपूर लोकांनी ह्याचा लाभ घेतला.  या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य मा. श्री.प्रकाश व्हनकडे, मा.श्री. मछिंद्र व्हनकडे ,मा.श्री.अमरदीप गाडेकर, मा.श्री. तानाजी व्हनकडे, मा. श्री. दिनकर चव्हाण, मा. श्री. संजय व्हनकडे, मा.श्री. महादेव व्हनकडे यांचे सहकार्य लाभले.

इंदिरा गांधी योजनेचे केंद्र सरकारकडून प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा.

Image
इंदिरा गांधी योजनेचे केंद्र सरकारकडून प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा. ----------------------------------------------------------------------------------    ----------------------------------------------------------------------------------    कागलमध्ये राष्ट्रवावदी काँग्रेस पार्टीची मागणी......                         आमदार हसनसाहेब मुश्रीफ आणि गोरगरीब लाभार्थ्यांचे नाते अतूट.......          कागल, दि. ३०:इंदिरा गांधी योजनेचे केंद्र सरकारकडून दरमहा दोनशे रुपयांप्रमाणे गेल्या आठ ते नऊ महिन्याचे प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा, अशी मागणी कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. संजय गांधी योजना समितीचे माजी अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली  नायब तहसीलदार सौ. अर्चना कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.                   निवेदनात म्हंटले आहे, इंदिरा गांधी योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अशा लाभार्थ्यांना दर

प्रा. नितेश कराळे यांच्या मारेगाव येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मारेगाव कॉलेजच्या वतीने केले होते आयोजन.

Image
 प्रा. नितेश कराळे यांच्या मारेगाव येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मारेगाव कॉलेजच्या वतीने केले होते आयोजन. -------------------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र यवतमाळ प्रतिनिधी -------------------------------------------------------------------------- मारेगाव, यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेतून तालुका मारेगाव येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मराठी विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ डिसेंबर २०२२रोजी खद खद मास्तर प्रा. नितेश कराळे यांचे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    यावेळी मंचावर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. नितेश कराळे सर होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून रंगनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, डॉ. महेंद्र लोढा होते. प्रमुख अतिथी म्हणून केशवजी सवळकर (विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रेस संपादक व पत

श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न.

Image
श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न. ----------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------- श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचालित श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुदत्त शुगरचे संचालक श्री बबन चौगुले व जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले, विद्यमान सरपंच श्रीमती मंगल बिरणगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.  मुख्याध्यापक संजय तपासे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रीडा ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण झाल्यानंतर क्रीडा ज्योतीचे पूजन व  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी यांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी क्रीडा स्पर्धेला समर्पित समूहनृत्य व हलगी नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले. उपस्थित मान्यवर अतिथींचा सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.     यानंतर क्रीडा मैदानावर श्री विकास चौगुले यांच्या हस्ते नाणेफेक करून क्रीडा स्पर्धेची

प्रा. दिलीप देसाई यांना पीएचडी.

Image
 प्रा. दिलीप देसाई यांना पीएचडी. ------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------  प्रा. दिलीप भाऊसाहेब देसाई यांना कॉम्प्युटर मॅनेजमेंट या विषयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान करण्यात आली. ‘पौंगंडावस्थेतील मुलांवर मोबाईल गेमिंगमुळे होणाऱ्या परिणामांचे डेटा मायनिंग तंत्रज्ञानाच्या आधारे विश्लेषण’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्यांना प्रा. डॉ. अभिजीत काईवडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. दिलीप देसाई हे केआयटीज आयएमईआरमध्ये गेल्या बारा वर्षांपासून एमसीए विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर दोन पेटंट प्रकाशित झाले आहेत. त्यांना केआयटीचे चेअरमन सुनिल कुलकर्णी, व्हाईस चेअरमन साजिद हुदली, सेक्रेटरी दीपक चौगुले, ट्रस्टी डायरेक्टर सचिन मेनन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे प्रोत्साहन लाभले.

कुंभार समाजाचा राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा संपन्न!

Image
 कुंभार समाजाचा राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा संपन्न! ----------------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------------- कोल्हापूर:- आज दिनांक २५-१२-२०२२ रोजी उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य मा. चंद्रकांत दादा पाटील व मधुरिमा राजे यांच्या हस्ते संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली संपुर्ण महाराष्ट्रात विखुरलेला कुंभार समाज एकत्र व्हावा व कुंभार समाजातील मुला- मुलींच्या लग्नासाठी होणारी वधू वराच्या पालकाची होणारी पायपीट थांबावी समाजाशी  आपली नाळ जूळावी आपला कुंभार समाज महाराष्ट्रात कुठे - कुठे आहे याची कुंभार समाजाला ओळख व्हावी यासाठी माजी नगरसेवक,व कुमावत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश कुंभार सरवडेकर माजी उपमहापौर अरुण आण्णा निगवेकर यांच्या प्रयत्नातून कुमावत को - ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर. कोल्हापूर शहर कुंभार. माल उत्पादक सोसायटी लिमिटेड कोल्हापूर, जिल्हा, कुंभार समाज

शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण येथील कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे ,संचलित न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण येथे पार पडला विज्ञान मेळावा.

Image
 शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण येथील कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे ,संचलित न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण  येथे  पार पडला विज्ञान मेळावा. ----------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------------- शाहूवाडी:कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे ,संचलित न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण तालुका शाहूवाडी येथे दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी  विज्ञान मेळावा संपन्न झाला  या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक कुंभी बँक कुडित्रेचे चेअरमन, गोकुळ दूध संघ कोल्हापूर चे विद्यमान संचालक माननीय अजित नरके साहेब अध्यक्षस्थानी होते तसेच युवा नेते राजवीर नरके साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थेचे प्रशासन अधिकारी माजी प्राचार्य बी आर अकिवाटे सर, डी.सी.नरके विद्यानिकेतनचे प्राचार्य ए.एम.पाटील सर,बंडा पाटील सर,मिसाळ सर व भागातील सर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते विज्ञान मेळाव्यात 90 उपकरणांची मांडणी करण्यात आली होती म

शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरिष्ठ महावितरण अभियंता कोल्हापूर यांना देण्यात निवेदन.

Image
 शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरिष्ठ महावितरण अभियंता कोल्हापूर यांना  देण्यात निवेदन. --------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------- शाहूवाडी: स्वाभिमानी शेतकरी संघटना शाहूवाडी विभाग यांच्या वतीने विशालगड मांजरे फिडर वरून येळवण जुगाई, मांजरे, पारिवने, गेळवडे, शेंबवणे, मौसम, अनुस्कुरा, कुंभवडे ,गावडी, बर्की, कांटे, आणि बुरंबाळ या गावांना विजेचा वीज पुरवठा होत  आहे हा भाग अगोदरच डोंगराल असल्याने वारंवार वीज पुरवठा विविध कारणाने खंडित होत असतो त्यामुळे रात्री अपरात्री शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी महावितरण कंपनीने दिलेल्या वेळेत  तासंन तास  वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकाचे अतोनात नुकसान होत आहे तरी  खंडित होणारा वीज पुरवठा वाढवून द्यावा म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी फोन द्वारे तसेच तोंडी मागणी करून ही /अधिकारी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवसाचे नियोजन कोलमडून पडत होते ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठां

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतचा आढावा.

Image
 पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतचा आढावा. ------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रजनी सचिन कुंभार  कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी -------------------------------------------------  प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका तसेच कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्था यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतच्या अनुषंगाने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती घेतली व या विषयाचा अभ्यास करुन पुढील काळात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. सर्किट हाऊस येथील सभागृहात आयोजित कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार राजेंद्र यड्रावकर, मित्रा चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे ॲड. बाबा इंदुलकर, आर. के. पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबत नागरिक व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेत

आदिवासींच्या प्रश्नावर विधान सभेत जोरगेवार धडकले !!

Image
 आदिवासींच्या प्रश्नावर विधान सभेत जोरगेवार धडकले ! ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मंगेश तिखट  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  ----------------------------------- ते वन क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम काढा ,,आबिद अली. राजुरा उप विभागातील मौजा.कुसुंबी व नोकारी येथील १७/०८/१९८१ ला चुनखडी उत्खनना करिता ६४३.६२ हेक्टर जमीन २० वर्षाच्या लीज वर देण्यात आली होती.व शासनाने भूपृष्ठ अधिकार बहाल केलेल्या क्षेत्रापैकी १५०.६२ हे.आर जमीन वन विभगाला अभ्यार्पित करण्यात आली. मात्र हे क्षेत्र कुठे आहे या बद्दल वन विभाग अनभिज्ञ आहे.शासनाने मंजूर केलेल्या ४२९.३८ हे.जमिनीचे भूमापन सीमांकन करून चिन्हाकित केलेले नाही.तसेच भूमापन क्रमांक ३४,३५,३६,५७,५८,५९ हे ६४३.६२ हे.जमीन लिज करारात नमूद आहे मात्र या क्षेत्रात बांधकाम करण्यासंबधात उल्लेख नाही.कूप नंबर ३४,३५,३६,ची १५०.६२ हे.जमीन अभ्यार्पित झाल्याने उर्वरित ४९३ हे.जमीन मध्ये खाण क्र.१.२२९  हे. खाण क्रमांक २. १९०. हे. खाण क्रमांक ३. ३०२.५८ अशी एकूण पाच खदानी मध्ये उत्खनन झाले असून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक जमिनीवर चुनखडी उत्खनन झाले कसे. य

डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 भव्य कृषी प्रदर्शन.

Image
  डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 भव्य कृषी प्रदर्शन.  ----------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------ सांगवडे÷ डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 भव्य कृषी प्रदर्शन दिनांक 23 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ऊस, भाजीपाला, फुले, फळे, व कृषी प्रक्रिया उत्पादने स्पर्धा आयोजित केले गेले. दिनांक 23 डिसेंबर 22 रोजी याचे उद्घाटन समारोह झाले आहे .तसेच डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा व कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 लोकार्पण झाले. यावेळी मौजे हलसवडे गावातील महिला शेतकरी यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला यांची एक दिवसीय प्रक्षेत्र भेट म्हणून या प्रदर्शनाला भेट देण्यात आली. महिलांना उद्योजकता व स्वयं निर्धारित होण्यासाठी प्रक्षेत्र भेट नेण्यात आली. इथे माननीय विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापू

एलआयटीच्‍या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्‍याचे आज 24 डिसेंबर रोजी उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती.

Image
  एलआयटीच्‍या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्‍याचे आज 24 डिसेंबर रोजी उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती. ------------------------------------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र नागपूर, प्रतिनिधी ------------------------------------------------------------------- लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) च्‍या दोन दिवसीय जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्‍याचे (ग्‍लोबल अॅल्‍युमनी मीट - 2022) उद्घाटन शनिवार, 24 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत होणार आहे. लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी परिसर, अमरावती रोड येथे होणा-या या कार्यक्रमाला राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची विशेष उपस्‍थ‍िती राहील.  ‘वन ड्रीम, वन टीम’ या संकल्पनेवर आधारित या ग्लोबल अॅल्युमनी मीट - 2022 चा मुख्‍य उद्देश एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (LITAA) च्‍या माध्‍यमातून सक्रिय व समर्पित माजी विद्यार्थी नेटवर्क तयार करणे, हा आहे. दोन द

नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक तिन दिवसीय कबड्डी सामन्यात महाकाली क्रिडा मंडळ, यांना प्रथम पारितोषिक !

Image
 नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक तिन दिवसीय कबड्डी सामन्यात महाकाली क्रिडा मंडळ,  यांना प्रथम पारितोषिक ! ---------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ------------------------------------------- व्हिडीओ कॉलिंग द्वारे नाम. मुनगंटीवार यांनी सहभागी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा ! चंद्रपूर (का.प्रति.) : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळाद्वारे नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक शुक्रवार दि. १६ ते १८ डिसेंबरपर्यंत ३ दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन इंदिरानगर येथे करण्यात आले होते. यामध्ये ५६ किलो वजन गटाच्या ५२ क्रीडा मंडळांनी सहभाग घेतला असून अमर्यादित ओपन २६ क्रीडा मंडळाने सहभाग घेतला. नाम. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकास कामाला प्रेरित होऊन नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक मनोज पोतराजे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष मान. देवरावदादा भोंगळे व उपमहापौर राहुल भाऊ पावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी या तिन दिवसीय युथ चषक सामन

कवटाळा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा फडकला.

Image
कवटाळा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा फडकला. ------------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ------------------------------------------  कोरपना तालुक्यातील कवटाळा ग्रामपंचायत वर शिवसेना  उद्धव बाळासाहेब  ठाकरे  या गटाचा भगवा  फडकला  सरपंच पदाचे उमेदवार रूपाली गजानन बोबडे  बहुमताने विजय   सदस्य पदाचे उमेदवार,  भारत दुधकोर, अमोल कोडापे,वंदना कोडापे,  हे सर्व उमेदवार बहू मातांनी  विजय झाले  विजय झालेल्या उमेदवाराचा सत्कार करण्यात आला उपस्थित. महिला जिल्हाप्रमुख  उज्वला नलगे चंद्रपुर ; . तालुकाप्रमुख डॉ प्रकाश खनके कोरपना   उपतालुकाप्रमुख रवी वासाडे , माजी  ग्रामपंचायत सदस्य कवटाळा प्रशांत बोरकुटे तसेच रवी वासाडे, गजानन बोबडे,  स्वप्निल बोबडे,  प्रशांत  बदखल, श्रावण राऊत, मंगेश नागोसे, निलेश वासाडे,  साईनाथ सरोरे, रघुनाथ वरारकर, भारत दुधकोर, मोहन बोरकुटे,  उमाकांत बोबडे,  सुरज  धारणे,  मारोती आगलावे,  देवराव ठावरी, विठ्ठल वरारकर, शरद वरारकर, तसेच ग्रामवासी उपस्थित होते.

उंचगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधूकर चव्हाण विराजमान.

Image
 उंचगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधूकर चव्हाण विराजमान. ---------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------- उंचगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी पाच उमेदवार उभारले होते परंतु खरी लढत हि दोन उमेदवार मध्येचं होती मधूकर चव्हाण व मर्दाने यांच्यातच होती या अतितटीच्या लढतीत लोकनियुक्त सरपंच म्हणून मधूकर चव्हाण हे 69 मतानी विजयी झाले मधूकर चव्हाण हे सतेज पाटील गटाचे उमेदवार असून उंचगाव ग्रामपंचायती वर सतेज पाटील गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे  कोल्हापूर करवीर मधून विजयी लोकनियुक्त सरपंच खालील प्रमाणे हिरवडे खालसा काँग्रेसचे शेकाप चे नदीफ मुजावर हे विजयी गांधीनगरमध्ये  भाजपचे संदीप पाटोळे विजयी  सावर्डे दूमालात काँग्रेसचे भगवान रोटे विजयी सडोली दूमालात काँग्रेसचे अभिजीत पाटील विजयी  कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम विजयी   चिंचवडे तर्फे कळे मध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर विजयी  हिरवडे दुमालात  स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव विजयी  सोनाळीत सर्वपक्षीय काँग्र

पत्रकारिता करिअरचा नवीन चांगला पर्याय : शिवाजी होडगे.

Image
पत्रकारिता करिअरचा नवीन चांगला पर्याय : शिवाजी होडगे. -------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------- हल्लीच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारिता हा करिअर साठी खूप महत्त्वाचा व चांगला पर्याय आहे त्याचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करावा व ग्रामीण पत्रकारिते सारखा अभ्यासक्रम  शिकून पत्रकारिता कशी करावी, त्याची नियमावली शिकून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा असे मत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांनी व्यक्त केले. ते दूधसाखर महाविद्यालय,बिद्री येथे शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त आणि मराठी विभाग आयोजित ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाच्याउद्घाटनाच्या वेळी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते.   डॉ. होडगे पुढे म्हणाले, पत्रकारिता म्हणजे काय? त्यासाठी कोणती नियमावली आहे ?समाज व पत्रकारिता यांचा कसा जवळचा संबंध आहे ?यासंबंधी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाला मुरगुड परि

बेलवळे खुर्द प्राथमिक शाळेस माजी सैनिकांच्या कडून स्टेरिओ सेट भेट .

Image
  बेलवळे खुर्द  प्राथमिक शाळेस माजी सैनिकांच्या कडून स्टेरिओ सेट  भेट . ------------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  प्रतिनिधी  युवराज वाईंगडे ------------------------------------------------------------------- दि 19.12.2022 रोजी विद्यामंदिर बेलवले खुर्द तालुका कागल शाळेस स्टेरिओ बॉक्स व माइक सेट माजी सैनिकांच्या कडून भेट म्हणून देण्यात आला आजच्या ई लर्निंग च्या युवा मध्ये वाद्य वर्गामधील सजावट विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे वेगवेगळ्या सूचना या सर्वांची माहिती देण्यासाठी निश्चितच या स्टेरिओ बॉक्स चा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना होईल तसेच बेलवले खुर्द गावच्या नूतन सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सरपंच सौ सुप्रिया पाटील व डे.सरपंच छाया जाधव यांचा सत्कार पूनम पाटील मॅडम व गीता खोत मॅडम यांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजुगडे सर यांनी केले आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले माझी सैनिकांचे कार्य देशासाठी खूप गौरवास्पद असते त्याचबरोबर त्यांनी आमचे विद्यार्थ्यांना दिलेली ही अनोखी भेट आम्ही सर्वजण आनंदाने स्वीकारतो व त्य

कोरपणा पोलीस स्टेशनला सोनूर्ली महिलां महिला धडकल्या.

Image
 कोरपणा पोलीस स्टेशनला सोनूर्ली महिलां महिला धडकल्या. ---------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ----------------------------------------  तालुक्यातील सोनुर्ली गावांमध्ये अवैद्य दारू विक्री असून त्यांचा विपरीत परिणाम गावातील तरुण मुले महिला मुली यांच्यावर होत आहेत तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावत असून  दारूच्या व्यसन असलेल्या  कुटुंबात नेहमी झगडे भांडण होत आहेत त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहेत गावातील अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे याकरिता सोनुर्ली गावातील शेकडो महिला व पुरुष कोरपणा पोलीस स्टेशनला धडक दिलीत व गावात अवैद्य दारुमुळे होत असलेल्या परिस्थितीचे कथन महिलांनीच केले आम्ही सर्व महिला सहकार्य करण्यात तयार आहे करिता सोनुर्ली गावात दारू सुरू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करून दारू विक्रेत्यांवर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोनुर्लीतील महिला यांनी कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये धडक देऊन सदर कोरपणा ठाणेदार यांना निवेदन दिले.

राधानगरीत 15 फेऱ्यांमध्ये होणार होणाऱ्या 58 ग्रामपंचायतींची मतमोजणी!

Image
 राधानगरीत 15 फेऱ्यांमध्ये होणार होणाऱ्या 58 ग्रामपंचायतींची मतमोजणी! ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे ------------------------------------ राधानगरी तालुक्यातील मतमोजणी 15 फेऱ्यांमध्ये होणार असल्या ची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. व  सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या मतमोजणी गावांची नावे पुढील प्रमाणे पहिली फेरी- करंज फेन,  मल्लेवाडी ,आटेगाव ,केळोशी खुर्द कारिवडे दुसरी फेरी- पिंपळवाडी ,सुळंबी, घोडेवाडी, हसणे ,ओलवन तिसरी फेरी- तरसंबळे धामणवाडी वाघवडे खामकरवाडी मोहडे चौथी फेरी -तळगाव, कासार पुतळे ,कांबळवाडी ,मुसळवाडी, पाचवी फेरी -टिटवे ,मोगर्डे, सिरसे, कपिलेश्वर, मजरे, कासरवाडा सहावी फेरी - आकनुर, पडळी, तारळे खुर्द, कुडूत्री, दुर्गमांदवड, सातवी फेरी -राशिवडे खुर्द, कुंभारवाडी, पिरळ, सावर्धन,मौजे कासारवाडा ,कोते, नववी फेरी-सोन्याची शिरोली, अर्जुनवाडा, येळवडे, चाफोडी तर्फे तारळे, दहावी फेरी -शिरगाव ,आवळी बुद्रुक, चंद्रे, आडोली,  अकरावी फेरीफेरी- टिकपुरली, धामोड,  बारावी फेरी- तुरंबे, कसबा तारळे,  तेरावी फेरी -राशिवडे ब

दि. 18/12/2022 रोजीचे घुग्घुस ते मुंबई पायदळ मार्च आंदोलन तात्पुरते स्थगित..

Image
 दि. 18/12/2022 रोजीचे घुग्घुस ते मुंबई पायदळ मार्च आंदोलन तात्पुरते स्थगित. --------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी    --------------------------------------------- सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव  अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर घुग्घुस - ACC चांदा सीमेंट कंपनी घुग्घुस नकोडा जिल्हा चंद्रपूर येथील चार दलित कामगारांवरती गेल्या दहा महिन्यांपासून कामावरून काढून दिल्या बद्दल सफेद झंडा कामगार संघटनेचा माध्यमातून घुग्घुस चांदणी चौक येथे दि. 8/10/2022 पासुन आंदोलन सुरू असुन या आंदोलनाची दखल घेत दोन ते तीन मिटिंग घुग्घुस पोलीस स्टेशन येत घेण्यात आली असुन या आंदोलनाचा तोडगा निघाला नसल्याने सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना यांनी या आंदोलनाला तीव्रतेने वाडविण्यासाठी दि. 18/12 /2022 /घुग्घुस ते मुंबई पायदळ मार्च काडुन मंत्रालयासमोर बेमुदत धरने आंदोलन करु असा इशारा दिला होता.  परंतु जिल्हा कोर्टाने दि. 17/12/2022 रोजी समंस पाठवुन त्यांना दि. 26/12/2022 /ठिक 11:00 वाजता उपस्थित राहावे असे समंस प

बाखर्डीजवळील भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू..

Image
 बाखर्डीजवळील भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू. --------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी --------------------------------------------   कढोली खुर्द येथील गायत्री रवींद्र बोन्डे हिचा दुचाकी अपघातात दुर्दैवी अंत झाला. बाखर्डी जवळ आज 18 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. नातलग मुलीच्या साक्षगंधाकरिता ती बाखर्डी येथे गेली होती. दरम्यान त्या मुलीसह ती गडचांदूरकडे बाईकने निघाली होती. दरम्यान कारने बाईकला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षगंध जिचा होता ती मुलगी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी झाले.  गायत्री ही महात्मा गांघी कनिष्ठ महाविद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी होती. विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असायचा. गायत्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

युवापिढीने ज्येष्ठांचा आदर आणि सन्मान ठेवल्याने पुण्य मिळेल : सखी साई रमेश प्रकाशजी महाराज

Image
युवापिढीने ज्येष्ठांचा आदर आणि सन्मान ठेवल्याने पुण्य मिळेल : सखी साई रमेश प्रकाशजी महाराज --------------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------------- गांधीनगर:- आपल्या कुटुंबातील युवा पिढीने ज्येष्ठांचा आदर राखून सन्मान ठेवा. त्यांची सेवा केल्याने  चांगले फळ आणि पुण्य तुम्हाला निश्चित मिळेल असे प्रतिपादन सखी साई रमेश प्रकाशजी महाराज (कटनी, मध्य प्रदेश) यांनी केले. ते गांधीनगर येथील सिंधी सेंट्रल पंचायत मध्ये आयोजित केलेल्या स्वामी शांति प्रकाश चालीसा महोत्सव समारंभ आणि गांधीनगर, कोल्हापूर येथील सिंधी समाजातील प्रतिष्ठित जेष्ठांच्या सन्मानाप्रसंगी  बोलत होते. साई रमेश प्रकाशजी महाराज म्हणाले   कुटुंबातील जेष्ठांनी हाल, अपेष्टा, आणि कष्ट करून आपल्या पिढीचा सांभाळ केला आहे. त्यामुळे युवा पिढीने त्यांचा अनादर न करता त्यांचा आदर राखून त्यांची सेवा केल्याने पुण्य मिळेल. या कार्यक्रमादरम्यान कोल्हापुर आणि गांधीनगरातील प्रतिष्ठित सत्तर जेष्ठ नागरिकांचा आणि गांधीनगरचे