अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कला महाविद्यालय कोवाडचे घवघवीत यश.

 अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कला महाविद्यालय कोवाडचे घवघवीत यश.

----------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

कोवाड (चंदगड) : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कोवाड  महाविद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत  यश संपादन केले.

दि.७, ८ आणि ९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जत येथील आर.आर. कॉलेज  येथे संपन्न झालेल्या अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या तीन खेळाडूनी यश संपादन केले. प्राजक्ता परशराम शिंदे, ५००० मी. धावणे प्रथम क्रमांक व १०००० मी. धावणे द्वितीय क्रमांक, सुशांत मनोहर जेधे ५००० मी. प्रथम क्रमांक तर किरण संजय मगदूम तृतीय क्रमांक पटकवून महाविद्यालयाचा लौकिक अंतर विभागीय स्पर्धेत पवाढवला आहे. या यशाबद्दल  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एम.एस.पवार, सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.ए.एस.जांभळे, संस्था सचिव मा.एम.व्ही. पाटील, प्रा.एन.एस.पाटील  यांनी यशस्वी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक प्रा.आर. टी.पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाच्या वतीने सर्व खेळाडूंचें कौतुक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.