आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहाचे बांधकाम सुरु करण्यात यावे.

 आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहाचे बांधकाम सुरु करण्यात यावे.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मंगेश तिखट 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

---------------------------------------------

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते संकेत कुळमेथे यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदणाद्वारे मागणी

कोरपना :- आज राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्य व्यवसाय व जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

या दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 2017- 18 मध्ये मंजूर झालेल्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. 1 चंद्रपूर च्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते संकेत कुळमेथे यांनी निवेदणाद्वारे केली.

याप्रसंगी चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र.1 सध्या भाडेतत्वावर सुरु असून याचा विद्यार्थ्याना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब युवानेते संकेत कुळमेथे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकामा बाबत योग्य ती कारवाई पूर्ण करून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करू असे आश्वासन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी युवानेते संकेत कुळमेथे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान किन्नाके, रामकिसन मडावी, विठ्ठलरावजी मडावी, प्रकाशजी शेडमाके, नितीन बावणे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.