वंचित च्या कार्यकर्त्याने वाचवले अनेक नागरिकांचे प्राण.!
वंचित च्या कार्यकर्त्याने वाचवले अनेक नागरिकांचे प्राण.!
---------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
मुंबई (कुर्ला ):-हनुमान नगर, राघव वन बिल्डिंग शेजारी, कुर्ला (पूर्व).24
येथे 21 नोव्हेंबर 22 रोजी रात्रीचे 12 ते 1 च्या सुमारास सुमारे तासभर घरगुती LPG गॅस सिलेंडर लिकेज चा उग्र वास येत होता. पण कोणालाच ठाऊक नव्हते कोणाच्या घरी सिलेंडर लिकेज आहे व वास कुठून येतं आहेवंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका शिक्षण समिती प्रमुख आयु किरण हिरवेयांनी घटनेचे गांभीर्य ओळखले त्यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नका कोणताही प्रकारे अग्नि पेटून नका अशा सूचना दिल्या,
ताबडतोब त्यांनी सदर घटनेची माहिती अग्नीशामक अधिकाऱ्यांना दिली, अधिकाऱ्यांनी वेळेवर येऊन लिकेज असलेल्या सिलेंडरचा शोध घेऊन तो सिलेंडर मानवीवस्ती पासून दूर घेऊन गेले, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली.
वंचित चे किरण हिरवे यांनी वेळीच समय सुचकता दाखवल्यामुळे कित्येक नागरिकांचे प्राण वाचले याबद्दल त्यांचे सर्व नागरिकां कडून कौतुक करण्यांत येतं आहे.
Comments
Post a Comment