राहुल गांधींच्या "भारत जोडो" यात्रेसाठी कुपवाड मधून काँग्रेस प्रेमी हिंगोलीला रवाना.!
राहुल गांधींच्या "भारत जोडो" यात्रेसाठी कुपवाड मधून काँग्रेस प्रेमी हिंगोलीला रवाना.!
भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून, नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली
जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने,
आनंदाने स्वागत केले आहे. या
पदयात्रेतून राहुलजींनी द्वेष संपवून
जातीपातीत अडकलेल्या देशाला
पुनःश्च बाहेर काढण्याचे काम
गांधीगिरीनेच भारत जोडो यात्रेतून
सुरु केले आहे. "नफरत छोडो भारत जोडो" हाच संदेश आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पसरवणार आहोत, असे कुपवाड शहर काँग्रेस अध्यक्ष सनी धोतरे यांनी सांगितले,
कुपवाड शहर काँग्रेस अध्यक्ष सनी धोतरे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कुपवाड शहरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच तरुणांचा प्रतिसाद मोठा मिळत आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसह हजारो लोक या यात्रेत सहभागी झाले. याबरोबरच भारत कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या कुपवाडमधील युवकांचा मोठा सहभाग भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रा सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाली. यात्रेचे महाराष्ट्रात काँग्रेसच्या वतीने मोठ्याप्रमाणात स्वागत करण्यात आले.
कुपवाड युवक काँग्रेस अध्यक्ष समीर
मुजावर यांनी भारत जोडो यात्रेच्या
स्वागतासाठी कुपवाड मधील तरुण
वर्ग उत्सुक असल्याचे सांगत, भारत
जोडो यात्रेसाठी कुपवाड शहरातील
युवक मोठ्या संख्येने हिंगोलीला.
येण्यासाठीचा सहभाग हा काँग्रेस पक्षाला समर्थन असून, भाजप सरकारचे अयशस्वी कारभारावर जनता नाराज असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment