झिलच्या मुलींची जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत बाजी, विभागीय स्पर्धेसाठी निवड.

 झिलच्या मुलींची जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत बाजी, विभागीय स्पर्धेसाठी निवड.

--------------------------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हास्तरीय 14 ,17 व 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा झिल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेज येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उदघाटन सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. प्रशांत पवार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यास झिलचे डायरेक्टर मा. श्री. संजय महाडिक सर, प्राचार्या सौ. मेघाली नरगच्चे मॅडम, अडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर श्री. अभय भिलवडे , स्पोर्ट्स डायरेक्टर श्री. शरद नागणे , सायन्स कोऑर्डीनेटर श्री. अलविन सिंग व श्री. सागर पाटील हे प्रमुख उपस्थित होते.या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी,कासेगाव,विटा,चिखली , पलूस, म्हैशाळसह 8 विविध शाळेतून मुलांचे 24 संघ तर मुलींचे 14 संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या प्रकाश झोतात रात्री 9च्या दरम्यान पार पडलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात  झिलच्या संघाने आदर्श विटा या संघावर 9-7 ने मात करून अजिंक्यपद पटकावले. या विजयासह झिलच्या मुलींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .झिल मध्ये संपन्न झालेल्या पहिल्याच जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने बाजी मारल्याने मुलींनी जल्लोषामध्ये विजयोत्सव साजरा केला. तसेच 14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत झिलचा संघ उपविजेता ठरला आहे. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे झिलचे डायरेक्टर मा. श्री. संजय महाडिक सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.

स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यादरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. प्रशांत पवार यांनी झिलने केलेल्या स्पर्धेच्या नेटक्या आणि शिस्तबद्ध नियोजनाबाबत झिल मॅनेजमेन्ट व शिक्षक वृंदाचे कौतूक केले व आभारही मानले तर झिलच्या सौ. मेघाली नरगच्चे यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

  परितोषक वितरण सोहळ्यामध्ये सर्व विजयी संघांना  मा श्री संजय महाडिक सर यांच्या हस्ते विजयी चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये  या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व  उपस्थित सर्व संघांचे आभारही मानले. सर्व संघाच्या व्यवस्थापकांनी उत्कृष्ट संयोजनाबद्दल झिलचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.