छत्रपती शासन महिला आघाडी इचलकरंजी वतीने आय डी एफ सी बँकेवर मोर्चा.
छत्रपती शासन महिला आघाडी इचलकरंजी वतीने आय डी एफ सी बँकेवर मोर्चा.
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर:-जयसिंगपूर जवळील उदगाव येथील राणीताई कोळी व इतर दोन महिलांना आय डी एफ सी बँकेचे वसुली अधिकारी अनिल शशिराव पाटील, विजय कांबळे, चेतन कांबळे, राजवीर पाटील, स्नेहा भोसले यातील अनिल पाटील आयडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या राणीताई कोळी यांना अश्लील भाषेत असभ्य वर्तन करून मानसिक त्रास दिला या कारणावरून छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने कोल्हापूर एसटी स्टँड मार्गावर असलेल्या आयडीएफसी शाखेच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी छत्रपती शासन महिला आघाडीच्या विराट मोर्चा काढला होता मोर्चा नेतृत्व छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने दिव्याताई मगदूम. यांनी केले बँकेचे जनरल मॅनेजर यांनी या वसुली अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला या मोर्चामध्ये उदगाव मधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Comments
Post a Comment