बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकावरील पुलाचा काही भाग कोसळला .

 बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकावरील पुलाचा काही भाग कोसळला .

--------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   
चंद्रपूर-किरण घाटे
--------------------------------------------------------------------------
अनेक जखमी ! जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले !राजू झोड़े यांनी केली जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी !  चंद्रपूर-किरण घाटे-आज रविवारी दि.२७नोव्हेंबरला  संध्याकाळी जिल्ह्याच्या बल्हारपूर येथील रेल्वे स्थानकावरील प्रवाश्यांच्या सेवेसाठी असणा-या पुलाचा काही भाग कोसळल्या मुळे या घटनेत आठ ते दहा व्यक्ती जखमी झाल्याचे बोलल्या जात आहे.दरम्यान जखमींना वाहनाने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त नुकतेच प्राप्त झाले. घटना घडली तेव्हा त्या परिसरात एकच खळबळ उडाली. सदरहु घटनेची माहिती वा-या सारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली .या वेळेस बघ्यांची गर्दी रेल्वे स्थानक परिसरात जमा झाली होती.

⬜▪️ गंभीररित्या जखमींवर तात्काळ उपचार करून जबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राजू झोडेंची  मागणी !

 महाराष्ट्राचे रेल्वे जंक्शन म्हणून समजल्या जाणाऱ्या बल्लारपूर रेल्वे स्थानकात आज पुल कोसळून मोठा अपघात घडला. या अपघातात पंधरा ते वीस व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले असून रेल्वेच्या चुकीच्या नियोजनामुळे हा अपघात घडला असा आरोप उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.मध्य रेल्वेतील बल्लारशा रेल्वे स्थानक हे भारतातील जंक्शन म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावर पादचाऱ्यांना ये जा करण्यासाठी रेल्वेने पुल तयार केला होता. परंतु या पुलाची मागील अनेक वर्षांपासून देखभाल व दुरुस्ती केली नाही. येथील आजी-माजी मंत्र्यांनी व रेल्वे अधिकाऱ्यांनी निव्वळ देखावा करण्याकरिता रंगरंगोटी करून भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळवला होता. परंतु ज्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष देऊन देखभाल व दुरुस्ती करावयाची होती ती केली नाही आणि यांच्या दुर्लक्षपणामुळे व चुकीमुळे आज गंभीर हानी झाली . 

दरम्यान रेल्वेचा पूल कोसळला या मध्ये पुलावरून जाणारे पादचारी गंभीरित्या जखमी होऊन मृत्यूची झुंज देत आहेत. या क्षेत्रातील आजी माजी पालकमंत्री ,रेल्वे अधिकारी यांनी फक्त देखावा दाखवण्याचे काम करून शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीचा गैरवापर केला परंतु रेल्वे पुलाचे काम जैसे ते ठेवले. सदरहु अपघात हा रेल्वेच्या चुकीमुळे झाला त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी व जखमींवर रेल्वे प्रशासनाने उपचार करून आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी देखील उलगुलान संघटनेचे राजु झोडे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.