Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्राबाहेर पोहचलेली राष्ट्रीय संघटना.

 लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्राबाहेर पोहचलेली राष्ट्रीय संघटना.

 ---------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  
स्वप्निल देशमुख
------------------------------------------------------------------------

विचारमंथन मेळाव्यात प्रा.डॉ.संतोष हूशे यांचे मनोगत पत्रकार स्वप्निल देशमुख बुलढाणा जिल्हाध्यक्ष नियुक्तीपत्र

अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही कोरोना काळात अकोला येथून स्थापन झालेली राष्ट्रीय संघटना  अवघ्या १९ महिण्याच्या अल्पावधित महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आणि बिहारमध्येही सभासद नोंदणी करण्यात  यशस्वी झालेली बहूसंख्य वृत्तविद्या पदविकाधारकांची फौज बाळगणारी संघटना आहे.पत्रकार व सामाजिक प्रश्न,उपक्रमांसोबतच पत्रकार कल्याण योजनांचा पाठपूरावा,कोराना मदती,पत्रकार हल्ल्यांप्रकरणी गृहविभाग आणि पोलिसांकडून मागण्यांना मिळालेले प्रतिसाद,या सर्व कर्तव्य आणि समाजनिष्ठ यशस्वी वाटचालीचे संघटना खरोखरच राष्ट्रीय स्वरूपात साकारीत होण्यास सुरूवात झालेली आहे.असे वास्तव प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक,मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोष हुशे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सातत्याने सुरू असलेल्या १५ व्या मासिक विचारमंथन आणि स्नेह मिलन मेळाव्यात ते अध्यक्षिय मनोगतातून बोलत होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ मार्गदर्शक समासेवी के.व्ही.देशमुख, डोंगरगांवकर, साहित्य संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे,संघटनेचे केंद्रीय कायदेविषयक मार्गदर्शक अॕड.नितीन धुत उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वप्रथम नियमित शिरस्त्याप्रमाणे सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक गाडगे बाबांना पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आले.यावेळी प्रा.डॉ.हुशे,संदिप देशमुख यांना त्यांच्या अनुपस्थितीत प्राप्त पुण्याच्या मणिभाई भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल भारतरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.विशेष न्यायाधिशपदी नियुक्ती झाल्याबाबत अॕड नितीनजी अग्रवाल,यांना सन्मानपत्र व शाल व पुष्पवृक्षाने सत्कार करण्यात आला.

                   

   निशिता नितीन धुत हिला सुप्रिम कोर्ट आणि दिल्ली बार असोसिएशन स्थापित इंटरनॅशनल इंडीया लॉ.युनिव्हर्सिटी या विधी अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय महाविद्यालयांमध्ये देशभरातील ३० विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश मिळाला.त्यात महाराष्ट्रातील ३ विद्यार्थ्यांमधून  नितिशाला विदर्भातून एकमेव प्रवेश मिळाल्याने तिचे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले.बुलढाणा नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष पत्रकार स्वप्निल देशमुख यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करून त्यांचे सहकाऱ्यांसह अभिनंदन करण्यात आले.उपस्थित पदाधिकारी आणि सभासदांनाही संघटनेच्या ओळखपत्रांचे  वितरण करण्यात आले.संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून संघटनेची प्रकाशित होत असलेली वार्षिक दिनदर्शिका आणि उपक्रम व वाटचालीबाबत माहिती दिली.अथितींनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

 या कार्यक्रमाला केंद्रीय उपाध्यक्ष,जेष्ठ पत्रकार प्रदिप खाडे,कीशोर मानकर,सचिव राजेन्द्र देशमुख,अॕड.राजेश जाधव, विभागीय पदाधिकारी डॉ.शंकरराव सांगळे,सौ.जया भारती(इंगोले),अंबादास तल्हार,अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,सौ.दिपाली बाहेकर,मंगेश चऱ्हाटे,राहूल राऊत,सागर लोडम,सतिऔ

श देशमुख,(निंबेकर) दिलीप नवले,प्रा.मनोज देशमुख,कुलकर्णी,ज्ञानेश्वर दांदळे पाटील,नंदु खानझोड, ( बुलढाणा)संदिप आ.देशमुख,आकाश हरणे,पंकज देशमुख,देशमुख समाज व जागृती मंडळाचे प्रा.संजय देशमुख,जागृती अध्यक्ष संजय देशमुख ( कंझारेकर) अश्विन देशमुख,राजाभाऊ देशमुख( कवठळकर) राजाभाऊ देशमुख,नितीन देशमुख,योगेश देशमुख,अनिल देशमुख,( रिधोरेकर)हरिष देशमुख,यशवंत देशमुख,प्रविण देशमुख,अंकुश तंवर,व बहूसंख्य पत्रकार आणि स्नेहीजण उपस्थित होते.केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments