बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर.

 बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

----------------------------------------

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य

बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटूंबियांना जाहीर केले आहे.



Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.