राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धेत प्रेम जरपोतवार ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी!

 राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धेत प्रेम जरपोतवार ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी!

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र         

मंगेश तिखट 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

------------------------------------------

सोशल एज्युकेशन मुव्हमेंट व नेहरू युवा केंद्र जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान महाराष्ट्र राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धा ही२०२१ मध्ये लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून शाळा, सामाजिक संस्था व वैयक्तिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. सदरहु स्पर्धेत संविधान दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे संयोजन व उत्तम सादरीकरण केल्याबदल सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडावार कॉलेज ऑफ सोशल चंद्रपूर येथील एम एस डब्ल्यू प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रेम नामदेव जरपोतवार याने द्वितीय क्रमांक पटकाविला. संविधान जागर स्पर्धा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  दि. २७ नोव्हेंबर २०२२ ला लुंबिनी बौद्ध विहार चामोर्शी येथे पार पडला . आयोजित या स्पर्धेत  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रेम  जरपोतवार यांनी प्राप्त केले.

या वेळी जरपोतवार यांना ३५०० हजार रुपये रोख, ३५०० रुपयांचे ग्रंथ व सन्मानचिन्ह देवून संविधान अभ्यासक  डॉ. के. प्रेमकुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.