चांदीची पालखी अर्पण सोहळा.

 चांदीची पालखी अर्पण सोहळा.

-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

 श्री लक्ष्मी नरसिंह आशीर्वादाने सांगवडे गावातील सर्व ग्रामस्थ, श्रींचे भक्त, श्रींचे पुजारी या सर्वांच्या प्रयत्नातून व सर्वांच्या सहकार्यातून साकारलेली चांदीची पालखी. श्रींच्या चरणी अर्पण करण्याचा सोहळा मार्गशीर्ष पहिला गुरुवार दि.24/11/2022 रोजी आयोजित केला असून. पालखीची शोभायात्रा सांगवडे फाटा येथून सकाळी 7 वा. भव्य लवाजम्यासह सुरू होऊन गावातून श्री नरसिंह मंदिरात येईल त्यानंतर पालखी पूजन होऊन श्री चरणी पालखी अर्पण करण्यात येईल.

     पालखी सोहळ्यासाठी पारंपारिक ढोल व 5 नाचणारी घोडी व आनंद बँड कंपनी, बारामती यांचं व महाप्रसादाच नियोजन केल आहे. महाप्रसाद स.11वा. नरसिंह मंदिराच्या आवारात सुरू होईल.स्वागतोत्सुक 

सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ सांगवडे व सांगवडे वाडी तसेच पालखी समिती, समस्त पुजारी, पालखीचे मानकरी, सेवेकरी, वारकरी सांप्रदाय, गावातील सर्व तरुण मंडळी व सर्व संस्था.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.