पाण्याच्या समस्येवर अभ्यास करण्यासाठी तलतज्ज्ञांची गरज – प्रा. संजय भेंडे वॉअरशॉपी उद्योजक विकास उपक्रमाचे उद्घाटन.
पाण्याच्या समस्येवर अभ्यास करण्यासाठी तलतज्ज्ञांची गरज – प्रा. संजय भेंडे वॉअरशॉपी उद्योजक विकास उपक्रमाचे उद्घाटन.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जगभरात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या आहेत. या समस्यांवर अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलतज्ज्ञांची आज गरज आहे. वॉटरशॉपी वर्ल्डवाईडच्या उद्योजक विकास उपक्रमातून असे जलतज्ज्ञ तयार होतील असा विश्वास नागपूर नागरिक सहकारी बँक व मैत्री परिवार संस्था अध्यक्ष संजय भेंडे यांनी व्यक्त केला.
नटराज निकेतन संस्थेच्या वतीने नुकतेच वॉटरशॉपी वर्ल्डवाइड उद्योजक विकास उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला जलतज्ज्ञ मुकुंद पात्रीकर, नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला पात्रीकर, व विलास पात्रीकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रशांत दुधे, पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली व गोंदिया संदीप पाटील यांच्यासह डॉ. सचिन लढ्ढा, डॉ.उदय बोधनकर, रवींद्र फडणवीस, दत्ता पाटील, तन्वीर मिर्झा, डॉ. अमूल धांडे, डॉ. दिलीप बारसागडेर, डॉ. तनुजा नाफडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुकुंद पात्रीकर म्हणाले, वॉटरशॉपीच्या माध्यमातून एक उत्कृष्ट करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. येत्या एक वर्षात लाखो जलतज्ज्ञ व उद्दोजक तयार करणे. त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे पाठबळ व त्या व्यवसायाबददल लागणाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, नविन उद्योजकाला स्वत:ची वेबसाइट तयार करण्यासोबतच प्रशिक्षण, मार्गदर्शन, अकाउंट रिलेटेड सर्विसेस, कायदेविषयक सर्विसेस ह्या सगळ्या सोई एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
एमएसएमईचे श्री. बघेल सर, कमलनाथजी सीथा, अनंत कठाळे, भूषण सहस्त्रबुद्धे, डॉ. भावना कुलसंगे, मोनिका जैन, डॉ.चंदन बनवडे, प्राजक्ता फडणवीस यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सफलतेकरीता निखिल व्यास, मधुरा व्यास, हर्षदा पात्रीकर, अर्पण कठाळे, मोहनीश अमृतकर, आकाश सुर्यवंशी, आकाश बोकडे, वैशाली शिंदेकर, गायत्री व्यास यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment