मनोहर म्हैसाळकर हे सर्वसमावेशक कार्यकर्ते होते - प्रकाश एदलाबादकर वि .सा. संघाच्या ग्रंथालयात छायाचित्राचे अनावरण.

 मनोहर म्हैसाळकर हे सर्वसमावेशक कार्यकर्ते होते - प्रकाश एदलाबादकर वि .सा. संघाच्या ग्रंथालयात छायाचित्राचे अनावरण.

--------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नागपूर  प्रतिनिधि       
-------------------------------------------------------------
मनोहरराव म्हैसाळकर यांचा विदर्भ साहित्य संघाशी पन्नास वर्षे सक्रीय राहिले. या काळात त्यांनी अनेक कार्यकर्ते, साहित्यिक जोडले, संस्थेच्या कार्याचा विस्तार केला व समाजाच्या सर्वच घटकातील व्यक्तींना संस्थेत प्रतिनिधित्व दिले. प्रस्थापित आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ते सर्वसमावेशक कार्यकर्ते होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश एदलाबादकर यांनी केले. 

विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष कै. मनोहर म्हैसाळकर यांच्या छायाचित्राचे त्यांच्या मासिक स्मृतिदिनी  विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात सोमवारी अनावरण झाले. न्या. रोहित देव, अस्मिता देव आणि आशुतोष शेवाळकर यांचे हस्ते अनावरण झाले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

विदर्भ साहित्य संघ हा मनोहर म्‍हैसाळकर यांचा बहिश्चर प्राण होता. वि. सा. साहित्य संघाचे एक अत्याधुनिक सांस्कृतिक संकुल असावे, हे आपले स्वप्न प्रत्यक्ष बघण्याचे त्यांना भाग्य लाभले.  शेवाळकर-म्हैसाळकर यांचा कार्यकाळ म्हणजे संस्थेचे सुवर्ण युग होते, असे ते म्‍हणाले. 

अध्यक्षपदावरून बोलताना प्रदीप दाते म्हणाले की, संस्थेच्या शताब्दी वर्षात मनोहररावांचे आम्हाला सोडून जाणे अत्यंत वेदनादायक आहे. वर्धा येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांची उणीव आम्हाला  तीव्रतेने जाणवेल. हे संमेलन उत्तम रीतीने आयोजित करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक अलोणी यांनी केले तर माधुरी वाडीभस्मे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.