टाकळीवाडी मध्ये मोठ्या उत्साहात बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या.

 टाकळीवाडी मध्ये मोठ्या उत्साहात बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या.

----------------------------------------------------------------------------------


-----------------------------------------------------------------------------------
टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथे  प्रथमच भव्य अशा बॉक्सिंग स्पर्धा भरविण्यात आलेले होते.या स्पर्धेमध्ये कोल्हापूर मधील 130 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये मोटे स्पोर्ट्स अकॅडमी वसगडे,संजय घोडावत इन्स्टिट्यूट,इचलकरंजी, अकिवाट व इतर खूप ठिकाणाहून या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 

ही स्पर्धा सकाळी 9.30 सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन श्री गुरुदत्त साखर कारखाना टाकळीवाडी यामधील सिक्युरिटी या स्टाफचे इन्चार्ज शामराव पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी गावातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली.

   ही स्पर्धा योग्य नियोजनाने पार पडली .या स्पर्धेचे आयोजक अमर गोरे,कृष्णा कोळी, निवास एकसंबे व भरत सलगरे यांनी केली.या स्पर्धेच्या शेवटी मोटे स्पोर्ट्स अकॅडमी (कोल्हापूर शहर बॉक्सिंग असोसिएशन ) यांनी 24 सुवर्ण 4 रोप्य 3 कास्य पदकांची कमाई करून सैनिक टाकळीवाडी बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 यावर्षीची चॅम्पियनशिप मिळवली.

प्रथमच टाकळीवाडी मध्ये बॉक्सिंग स्पर्धा ठेवल्यामुळे चर्चेचा विषय बनला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.