तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 'झिल' चे घवघवीत यश.

 तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 'झिल' चे घवघवीत यश.


--------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये झिल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी घवघवीत यश संपादन करत १४ पदकांची कमाई करून वेगळा ठसा उमटविला आहे. सर्व पालक वर्गातून शाळेचे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. याबाबत झिलचे व्यवस्थापकीय अधिकारी अभय भिलवडे यांनी दिलेली माहिती अशी की,

 19 वर्षाखालील तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत झिलचा 11वी सायन्सचा विद्यार्थी समर्थ कुलकर्णी प्रथम तर मकरंद रिसवाडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. याशिवाय 14 वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही संघांनी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

  तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 97 किलो वजनी गटात 12वी सायन्सचा विद्यार्थी मुझम्मील शेख याने प्रथम क्रमांक मिळविला तर 57किलो वजनी गटात 11वी सायन्सचा विद्यार्थी प्रथमेश पवार यानेही प्रथम क्रमांक पटकवून झिलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.याशिवाय 71किलो वजनी गटात 11वी सायन्सचा विध्यार्थी मकरंद रिसवाडे याने द्वितीय क्रमांक पटकावला.

   झिल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेज येथे तालुका स्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा , हॉकी कोच सौ. आरती हळींगळी (शेवाळे ) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासह झिलचे डायरेक्टर श्री संजय महाडिक सर, प्रिन्सिपल सौ. मेघाली नरगच्चे, अडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर श्री अभय भिलवडे व स्पोर्ट्स डायरेक्टर श्री शरद नागणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेतील 14 वर्षाखालील तायक्वांदो स्पर्धेमध्ये 29 किलो वजनी गटामध्ये झिलचा विद्यार्थी आर्यन बनसोडे याने सुवर्ण पदक मिळविले तर 38 किलो व 41 किलो वजनी गटामध्ये अनुक्रमे सार्थक चौगुले व आयुष जाधव यांनी रौप्य पदक पटकावले.41 किलो वरील गटामध्ये प्रकाश पांढरे यानेही रौप्य पदक पटकावले.17 वर्षाखालील स्पर्धेमध्ये 68किलो वजनी गटात श्रवण बनसोडे याने रौप्य पदकाची कमाई केली.मुलींच्या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील वयोगटात कु. इक्रा पठाण , कु. अंजेल कांबळे व कु. सृष्टी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर कु. प्रज्ञा जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.

 तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये जवळपास 14 पदकांची कमाई करून झिलच्या विद्यार्थ्यांनी शालेय  स्पर्धेवर झिलची छाप उमटवली आहे. झिलचे डायरेक्टर मा. श्री. संजय महाडिक सर , प्रिन्सिपल सौ. मेघाली नरगच्चे व अडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर श्री.अभय भिलवडे यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पोर्ट्स डायरेक्टर श्री. शरद नागणे यांच्या मार्गदर्शन तसेच सर्व स्पोर्ट्स कोचेस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच या सर्व खेळाडूंनी विविध स्पर्धेत ठसा उमटवला आहे. अशा भावना विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.