मुरगुडात कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ
मुरगुडात कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ .
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------- मुरगुड: शालेय कुस्ती स्पर्धांचा शुभारंभ करताना विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील , माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, शिवराज'चे प्राचार्य पी. डी. माने, राहुल शिंदे व अन्य मान्यवर.
येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती आखाड्यामध्ये कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांचा प्रारंभ झाला. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचालित विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल आणि शिवराज विद्यालय व ञ्यूनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे,
14, 17, 19 वर्षाखालील वयोगटामध्ये मुले व मुली फ्रीस्टाइल आणि ग्रिको रोमन या कुस्ती प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील कुस्ती खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. स्पर्धेचा शुभारंभ मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर तर प्रमुख पाहुणे शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने व गणेश नागरी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक राहुल शिंदे होते.
मुख्याध्यापिका सुषमा पाटील म्हणाल्या, सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली उच्चतम कामगिरी दाखवून दिली आहे. क्रीडा क्षेत्रामध्येदेखील महिला कमावत असलेल्या यशामुळे नारीशक्तीला प्रेरणा मिळत आहे. पी. डी. माने, बटू जाधव, सुनील मंडलिक, शोभा पाथरवट आदींनी मनोगत व्यक्त केले.
पंच म्हणून प्रकाश खोत, के. बी. चौगले, बटू जाधव, बाळू मेटकर, महेश शिंदे, दयानंद खतकर, सागर देसाई आदी काम पाहत आहेत. उद्घाटन कार्यक्रमास क्रीडा समन्वयक एकनाथ आरडे, पी. बी. पोवार, अशोक पाटील, शोभा पाथरवट, अलका बावडेकर, विद्या धडाम, अनिल कांबळे, पांडुरंग पुजारी, अमोल देवळे, संदीप मगदूम, अनिल दिवटे, संजू हवालदार आदी उपस्थित होते.
स्वागत साई कुस्ती आखाड्याचे एन आय एस कोच दादासो लवटे तर प्रास्ताविक शिवराजचे उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांनी केले. आभार सुनील मंडलिक यांनी मानले.
Comments
Post a Comment