जावली तहसील मध्ये दाखले काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी.

 जावली तहसील मध्ये दाखले काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी.


------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

सविस्तर:-मेढा ता जावली येथे गेल्या आठ दिवसापासून तहसील कार्यालय येथे नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत असून त्याच नेमकं कारण म्हणजे ग्रामपंचायत निवडणुक आणि पोलीस भरती प्रक्रिया शासनाने एकाच वेळी राबविली असून या साठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी लोकांनी तहसील कार्यालयात सेतू विभागत धाव घेतली असून या सेतू विभागा कडे प्रशासन लक्ष देत नसल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामकाज चालू असून दाखले वेळवर मिळत नाहीत नागरिक हैराण झाले आहेत तरी शासनाने वेळीच पावले उचलावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या आधी RPI जावली तालुका अध्यक्ष अमित साळुंखे यांनी निवेदनाद्वारे सुरळीत कारभारासाठी व शासनाच्या नियमित पावती करा पेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती मात्र आज अखेर कोणतीही कारवाई प्रशासनाने केली नाही या उलट ठेकेदाराच्या चुकीच्या कार्यपद्धती मुळे व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे तहसील कार्यालयात तोबा गर्दी पाहायला मिळाली.

 नुकतीच सुरू असलेली पोलीस भरती, निवडणूक प्रकिया , शैक्षणिक दाखले यासाठी ताटकळत बसावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो येणाऱ्या दिवसात सेतू विभागामध्ये कामाच्या कार्यपद्धती वर व अतिरिक्त पैसे घेण्यावर प्रशासनाने व ठेकेदाराने अंकुश न ठेवल्यास ठेकेदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा RPI(A) जावली तालुकाध्यक्ष अमित साळुंखे यांनी दिला आहे.


Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.