आरोग्य विभागाच्या कारनाम्याने पालिकेच्या प्रशासनाचे नाव खराब होत आहे?

 आरोग्य विभागाच्या कारनाम्याने पालिकेच्या प्रशासनाचे नाव खराब होत आहे?


---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर प्रतिनिधी

अन्सार मुल्ला

---------------------------------

 कोल्हापूर महानगरपालिका मधील आरोग्य विभागाने भ्रष्ट कारभारमध्ये कळसच गाठलंय अशी चर्चा शहरातील प्रत्येक चौकात सुरू आहे. प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशाचे अक्षरशः चिंधड्या उडवून दिली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. फ्रंटलाईन न्यूज चैनल आणि अन्य प्रसार माध्यमातून कायमपणे या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने या बातम्यांचा त्यांच्या वर कसलाच परिणाम दिसत नाही. हद्दतर या पुढे आहे की पत्रकार आणि काही सुजाण नागरिक यांनी वेळोवेळी या आरोग्य निरीक्षकांना प्रतिबंध असलेल्या प्लस्टीकच्या होलसेल दुकानात बोलवून देखील या भ्रष्ट आरोग्य निरीक्षकानीं कारवाई तर दूरच उलट अदीच या व्यापारीना माहिती देऊन दुकाने तात्पुरती बंद करून पळून जाण्याचा सल्ला दिला. त्या प्रकारे ते व्यापारी काही वेळा पुरते दुकाने बंद करून पळून जातात आणि नंतर बिनदिक्कत प्रतिबंधित प्लस्टीकची खुलेआम विक्री सुरू करतात.

लक्ष्मीपुरी येथील आरोग्य निरीक्षक मनोज लोट तर या अवैद्य व्यापारी वर्गातील सर्वात विश्वासु सद्स्य असल्याचे बोलले जात आहे. पत्रकारांनी स्वतः आयुक्त बलकवडे यांच्याकडे तक्रार केल्या नंतर देखील उपयुक्त अडसुळे यांनी मनोज लोट यांना बाजूला ठेऊन दुसरे आरोग्य निरीक्षक राजगोळकर यांना कारवाई करण्यासाठी पाठवून दिल्याचे सांगितले पण राजगोळकर देखील कारवाईचा देखावा करण्यात पटाईत निघाले. आठ दिवस करणे सांगून त्यांनी देखील या अवैद्य व्यापारी वर्गाची चांगली मर्जी मिळवली असे बोलले जात आहे. आता तर या व्यापाऱ्याची हिंमत इतकी वाढली आहे की ते त्यांच्या व्यापारी पेठेत उघपणे असे बोलत आहेत की जरी स्वतः आयुक्त जरी कारवाईसाठी बाहेर पडल्या तरी त्याच्या आदी पालिकेच्या सेवेत असणारे व्यापाऱ्यांनी पळून ठेवलेले अधिकारी कर्मचारी त्यांना आदी सांगून आयुक्तांची देखील कारवाई फोल करतील. आता आशा भयंकर प्रकरणात कारवाई होणार काय नुसती पालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघणार हे बघावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.