कौतुक डाफळे लाल आखाडा केसरीचा मानकरी.

 कौतुक डाफळे लाल  आखाडा केसरीचा मानकरी.

---------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------
लाल आखाडा व्यायाम मंडळ मुरगूड यांच्या वतीने जिल्हा आणि राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने  आयोजित कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात अंतिम कुस्तीत आंतरराष्ट्रीय मल्ल आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता मल्ल कौतुक डाफळे याने एकेरी पट, दुहेरी पट व भारंदाज डावावर शशिकांत बोंगाडेंवर ११-०१ अशा गुणांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा लाल आखाडा केसरीचा बहुमान  पटकावला. खुल्या गटात मंडलिक साई आखाड्याचा मल्ल रोहन रंडे याने विजय डोईफोडे (मंडलिक साई आखाडा) याच्यावर झोळी व पट काढून चार गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला.

४६ वर्षांखालील लाल आखाडा कुमार केसरीचा बहुमान शाहू साखरचा सोहम कुंभार याने पटकाविला. त्याने प्रवण घारेवर (तिटवे) विजय मिळविला या गटामध्ये तृतीय क्रमांक सारंग पाटील आमशी यांनी पटकावला. ५७ किलो वजन गटातील युवा केसरी ची गदा अतुल चेचर याने अमोल साळवीविरुद्ध रोमहर्षक विजय प्राप्त करत मिळवली. या गटामध्ये अमोल बंगार्डे बानगे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. अंतिम सामन्यास कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने उभा करण्यात आलेल्या सर्व गॅलरी खचाखच भरल्या होत्या तसेच हौशी कुस्ती रसिकांनी बैठक मांडून या कुस्तीचा आनंद घेतला. संध्याकाळी चार वाजल्यापासून सर्व गटातील मुख्य कुस्ती यांना सुरुवात झाली . सर्वच गटातील कुस्त्या रोमहर्षक झाल्यामुळे मल्लावरती बक्षिसांची खैरात होत होती. या तीन दिवसाच्या संपूर्ण स्पर्धेत संभाजी वरुटे,राजाराम चौगुले,बापू लोखंडे, प्रकाश खोत, बटू जाधव, कृष्णात पाटील, बाळू मेटकर, सिकंदर कांबळे, रवींद्र पाटील,महेश जाधव, अक्षय डेळेकर,के.बी चौगुले दयानंद खतकर यांनी पंच म्हणून काम पाहिले तर आंतरराष्ट्रीय कोच बटू जाधव आणि माजी राष्ट्रीय मल्ल राजाराम चौगुले यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये या सर्व कुस्तीचे समालोचन केले.

 वजनी गटामधील विजयी मल्ल पुढीलप्रमाणे:-

२५ किलो : शिवरुद्र चौगुले (एकोंडी), श्रेयस पुजारी (तळसंदे), सत्यजित निचिते (व्हनाळी).

३० किलो संदेश परीट ( खाटांगळे), शुभम जठार (बानगे), रितेश मगदूम (बानगे)

३५ किलो राजवर्धन पाटील ( नावली ), श्रेयश बोडके (दऱ्याचे वडगाव), साहिल फाटक (कोगे).

४२ किलो धनराज जमनिक (बानगे), प्रथमेश पाटील (बानगे), महेश पाटील (सिद्धनेर्ली).

५२ किलो विवेक पाटील (खांटागळे), तनवेश पाटील,

विश्वजीत गिरीबुवा (हुपरी).

६० किलो : मृणाल पाटील(बेले)

प्रणव मोरे (मुरगूड), सुशांत पाटील (म्हाकवे)

६१ किलो : विनायक रावण (वाघुर्डे), स्वप्नील इंदलकर (मुरगूड ), यश पाटील (वाशी).

६५ किलो : कुलदीप पाटील (राशिवडे), कर्णसिंह देसाई (भामटे), संतोष हिरुगडे (बानगे)

विजेत्यांना समरजित घाटगे, वीरेंद्र मंडलिक, रणजितसिंह पाटील, राजेखान जमादार, विश्वजित पाटील, पदमसिंह पाटील आदींच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी दीनानाथ सिंह, रणजितसिंह पाटील, वीरेंद्र मंडलिक, समरजित घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक संतोषकुमार वंडकर यांनी केले यावेळी बिद्री’चे उपाध्यक्ष विठ्ठल खोराटे, गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, शाहू साखर चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, दत्तामामा खराडे, विश्वजीत पाटील,पद्मसिंह पाटील, दत्तामामा जाधव, पांडुरंग भाट, सुखदेव येरुडकर, पंडितराव केणे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आभार युवराज सूर्यवंशी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.