कोल्हापूर जिल्ह्यातील चालू असलेली कंपनी ए . एस . ट्रेडर्स ॲन्ड डेव्हलपर्समधील गुंतवणुकदार , यांनी मोठया संख्येने दसरा चौक मध्ये जमून निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे याना निवेदन दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील चालू असलेली कंपनी ए . एस . ट्रेडर्स ॲन्ड डेव्हलपर्समधील गुंतवणुकदार , यांनी मोठया संख्येने दसरा चौक मध्ये जमून निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे याना  निवेदन दिले.

----------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर (प्रतिनिधी)
----------------------------------------------------------------------
ए. यस. मधील हजारो गुंतवणुकदार सदर कंपनीसोबत 2017-18 पासून संलग आहोत . सदर कालावधीमध्ये या कंपनीकडून त्यांना  स्टॉक मार्केट ट्रेडिंग , कमोडीटी मार्केट ट्रेडिंग या विषयावर प्रशिक्षण मिळत होते व मिळत आहे . त्या माध्यमातून त्यांचे  बरेचसे गुंतवणुकदारतसेच त्यांची मुले मुलीही ट्रेडिंग करत आहेत . परंतू दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे व मार्केटमधील चढ उतारामुळे ज्यांना शक्य होत नव्हते ते सर्वजण कंपनीला आमच्या तर्फे " तुम्ही ट्रेडिंग करा व आम्हास योग्य तो परतावा दया " अशी विनंती केल्याने कंपनीकडे त्याकरीता गुंतवणुक केलेने कंपनीने आज पावतो त्यांना गुंतवणुकीवर ट्रेडिंग करून  योग्य तो परतावा वेळोवेळी दिलेला आहे . त्याचप्रमाणे मध्यंतरी कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्येही गुंतवणूकदारणा दैनंदिन रोजगारही ठप्प झाले होते . उत्पन्न शुन्य झाले होते , काहींच्या नोक - या गेल्या काहींच्या नोक - या होत्या पण पगार नव्हते , अवस्था दयनिय झाली होती . त्यावेळीही कंपनीने त्यांना न चुकता परतावे दिलेले आहेत .

 आणि त्यामुळे लाखो परिवारांचे जगणे सुसा झाले होते . सदर कालावधीमध्ये जर त्यांच्या साथीला आधाराला ए.एस. ट्रेडर्स कंपनी नसती तर काय झाले असते ? अशा सदरच्या ए . एस . ट्रेडर्स कंपनीने 2017 पासून आजपावतो एकाही व्यक्तीचा परतावा चूकविलेला अथवा टाळलेला नाही किंवा त्याबाबत कंपनीने तसे काही गैर कृत्य केल्याबाबत कोणतेही कायदेशिर दप्तरी तक्रार नाही . अशा सर्व मध्यम वर्गीय लोकांचा आधार असलेल्या कंपनीच्या विरुद्धकाही विक्षीप्त विकृत विचारांच्या लोकांनी कदाचित त्यांच्या स्वार्थापोटी ए.एस.ट्रेडर्स कंपनीची कार्यालये बंद करण्यास भाग पाडलेले आहेत . आमचे सांगणे आहे की , कंपनीमध्ये होणा - या बदलांबाबत अथवा घटनांबाबत कंपनीचे CMD व इतर पदाधिकारी वेळोवेळी समक्ष व तसेच Online Zoom मिटींग माध्यमातून सर्व गुंतवणूकदारांची मिटींग घेवून त्यामधून माहिती देत आले आहेत . त्याप्रमाणेच मागिल एक - दोन महिन्यांपासून आम्हास काही तांत्रिक व अपरिहार्य कारणांमुळे परतावे थोडेफार उशीरा होतील या बाबतची पूर्वकल्पना वेळोवेळी दिलेली आहे . त्याप्रमाणे थोडे फार विलंबनाने का होईना चार - पाच दिवसांपूर्वी पर्यंत गुंतवणुकदारांना कंपनीकडून परतावे मिळाले आहेत . कोरोना कालावधीत लॉक डाऊनच्या परिस्थितीतही ज्या कंपनीने  आधार दिला . वेळेत परतावे दिले . ती कंपनी सध्याच्या काळातही गुंतवणूकदारच्या  पाठीशी उभी राहून  परतावे नक्कीच देणार यात तीळ मात्र शंका नाही . याबददल सर्व गुंतवणुकदारांना ठाम विश्वास आहे . तरी प्रसार माध्यमांना पुरविलेल्या खोटया माहितीच्या बातम्यांमुळे  सामान्य गुंतवणुकदारांमध्ये भितीचे तसेच समाजामध्ये गैरसमजाचे वातावरण निर्माण होत आहे . सामान्य गुंतवणुकदार समाजामध्ये यामुळे पसरलेल्या गैरसमजामुळे हवालदिल झालेले आहेत . 

तसेच बळजबरीने बंद पाडलेल्या कार्यालयांमुळे गेले चार दिवसांपासून कंपनीस  परतावे देणे अशक्य झाले आहे . तरी त्यामुळे निर्माण होणा - या परिस्थितीमुळे तसेच .... जर कंपनी सुरू नाही राहीली तर याची जबाबदारी कोण घेतील का ?असा सवाल उपस्थित केला.  सध्याच्या विविध बातम्यांमुळे हवालदिल झालेल्या कोणा एखाद्या गुंतवणुकदाराने भितीपोटी त्याच्या जिवाचे काही बरे वाईट करून घेतलेस त्यांस जबाबदार कोण .. ? या वेळी गुंतवणूकदारांचा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे . न्यायालयाचा आणि प्रशासनाचा आदर करणारी लोक आहोत . न्यायालयाने करणा - या प्रकीयेत कोणताही हस्तक्षेप करणार नाही तथा प्रशासनाला कोणताही अडथळा करणार नाही . पोलिस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य राहील ए . एस . ट्रेडर्स चे CMD लोहीत सर यांनी ट्रेडींग घराघरात पोहचवलं आहे . सर्व सामान्य माणूस त्यांना ट्रेडींग ची कांती करणारा अवलिया मानतो . तरी वरील सर्व बाबींच्या सहानुतीपूर्वक विचार करून  सामान्य गुंतवणुकदारांची आधार असलेली . ए.एस. ट्रेडर्स अॅण्ड डेव्हलपर्स एल.एल.पी. या कंपनीचे कार्यालयीन कामकाज सुरु करून आमचे परतावे अखंडीत चालू रहावेत याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने सर्वसामान्य गुंतवणूकदार त्यांचे कुटुंबीय तसेच पुणे सांगली येथील गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.