सचिन शेलार यांची तालुका उपतालुका प्रमुख पदी निवड.
सचिन शेलार यांची तालुका उपतालुका प्रमुख पदी निवड.
----------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------
बाळासाहेबांची शिवसेना जावली तालुका - सचिन शेलार यांची उपतालुकाप्रमुख पदी निवड.
सविस्तर:-मेढा ता. जावली . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक, वाघदरे गावचे सुपूत्र मा.सचिन शेलार यांच्या राजकिय व सामाजिक कार्याची दखल घेत, मुख्य संघटना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जावली तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.आज मेढा येथे झालेल्या बैठकीत शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख मा.पुरुषोत्तम जाधव साहेब यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची नेमणूक केली. यापूर्वी शिवसेना बुथप्रमुख ते युवासेना तालुकाप्रमुख पदावर काम करत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच मा.श्री.एकनाथ शिंदे जनसेवा प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदावर कार्यरत आहे.
Comments
Post a Comment