मौजे वडगाव येथे शेतमजूर महिलेचा खून.पती बेपत्ता.
मौजे वडगाव येथे शेतमजूर महिलेचा खून.पती बेपत्ता.
----------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील चंदू किसन कोरवी आणि त्यांची पत्नी कविता चंदू कोरवी हे कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी दोन वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा हा निमशिरगाव येथे आजीकडे राहतो. तर लहान मुलगा हा आई-वडिलांच्याकडे मौजे वडगाव येथे राहतो. नेहमीप्रमाणे हे कुटुंब शेतमजुरीसाठी गेले असता.
आज दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मौजे वडगांव येथे असणाऱ्या सुतारपानंद रोडवर बार भाई शेती परिसरात कविता चंदू कोरवी या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शेतकऱ्यांना आढळून आला. मृतदेह शेजारी सायकल पडलेली होती. आणि मृत महिलेचा पती चंदू कोरवी हा बेपत्ता होता. या महिलेचा निर्घृण पणे खून केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मौजे वडगाव चे ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. हा खून नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
Comments
Post a Comment