सवलत योजनेचा 79064 करदात्त्यांनी घेतला लाभ.

 सवलत योजनेचा 79064 करदात्त्यांनी घेतला लाभ.

-----------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रजनी सचिन कुंभार
----------------------------------------------------------------------
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व मिळकतधारकांना पोस्ट ऑफीस मार्फत सन 2022/23 या आर्थिक वर्षासाठीची सुमार 155000 इतक्या मिळकतीची देयके लागु करणेत आली आहेत. सन 2022/23 या आर्थिक वर्षामधील घरफाळा देयकाचे चालु मागणीवर 2 टक्के सवलतीचे शेवटचे 10 दिवस शिल्लक असून दि. 1 डिसेंबर 2022 पासुन सन 2022/23 आर्थिक वर्षामधील घरफाळा देयकाचे चालु मागणीवर सुध्दा दंडाची आकारणी सुरु होणार आहे.

       

घरफाळा विभागाकडून शहरातील मिळकत कर चालू मागणी एक रक्कमी भरणा करणाऱ्या 79064 मिळकतधारकांनी आज अखेर दि. 1 एप्रिल ते 21 नोंव्हेबर. 2022 अखेर रु. 43 कोटी 39 लाख 36 हजार पाचशे सत्याण्णव फक्त इतका मालमत्ता कर भरणा केला आहे.  यामधील सुमारे 20614 करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेचा लाभ घेतला आहे. चालु मागणीवरील 2 टक्के सवलत योजनेचे शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत यांचा लाभ जास्तीत जास्त मिळकतधारकांनी घ्यावा.               

तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी आपल्या कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे व जास्तीत जास्त करदात्यांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा व दंडासारखा कटु प्रसंग टाळावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.