Posts

Showing posts from November, 2022

कोल्हापूर जिल्ह्यातील चालू असलेली कंपनी ए . एस . ट्रेडर्स ॲन्ड डेव्हलपर्समधील गुंतवणुकदार , यांनी मोठया संख्येने दसरा चौक मध्ये जमून निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे याना निवेदन दिले.

Image
कोल्हापूर जिल्ह्यातील चालू असलेली कंपनी ए . एस . ट्रेडर्स ॲन्ड डेव्हलपर्समधील गुंतवणुकदार , यांनी मोठया संख्येने दसरा चौक मध्ये जमून निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे याना  निवेदन दिले. ---------------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर (प्रतिनिधी) ---------------------------------------------------------------------- ए. यस. मधील हजारो गुंतवणुकदार सदर कंपनीसोबत 2017-18 पासून संलग आहोत . सदर कालावधीमध्ये या कंपनीकडून त्यांना  स्टॉक मार्केट ट्रेडिंग , कमोडीटी मार्केट ट्रेडिंग या विषयावर प्रशिक्षण मिळत होते व मिळत आहे . त्या माध्यमातून त्यांचे  बरेचसे गुंतवणुकदारतसेच त्यांची मुले मुलीही ट्रेडिंग करत आहेत . परंतू दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे व मार्केटमधील चढ उतारामुळे ज्यांना शक्य होत नव्हते ते सर्वजण कंपनीला आमच्या तर्फे " तुम्ही ट्रेडिंग करा व आम्हास योग्य तो परतावा दया " अशी विनंती केल्याने कंपनीकडे त्याकरीता गुंतवणुक केलेने कंपनीने आज पावतो त्यांना गुंतवणुकीवर ट्रेडिंग करून  योग्य तो परतावा वेळोवेळी

झिलच्या मुलींची जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत बाजी, विभागीय स्पर्धेसाठी निवड.

Image
 झिलच्या मुलींची जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत बाजी, विभागीय स्पर्धेसाठी निवड. -------------------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------------------- जिल्हास्तरीय 14 ,17 व 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा झिल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेज येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उदघाटन सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. प्रशांत पवार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यास झिलचे डायरेक्टर मा. श्री. संजय महाडिक सर, प्राचार्या सौ. मेघाली नरगच्चे मॅडम, अडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर श्री. अभय भिलवडे , स्पोर्ट्स डायरेक्टर श्री. शरद नागणे , सायन्स कोऑर्डीनेटर श्री. अलविन सिंग व श्री. सागर पाटील हे प्रमुख उपस्थित होते.या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी,कासेगाव,विटा,चिखली , पलूस, म्हैशाळसह 8 विविध शाळेतून मुलांचे 24 संघ तर मुलींचे 14 संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या प्रकाश झोतात रा

शासकीय ॲम्बुलन्स बार व ढाब्यावर उभ्या बार येथे उभ्या करण्याची परवानगी कोणी दिली.पी एन देशमुख.

Image
 शासकीय ॲम्बुलन्स बार व ढाब्यावर उभ्या बार येथे उभ्या करण्याची परवानगी कोणी दिली.पी एन देशमुख. ------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  विशेष प्रतिनिधी ------------------------- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे रुग्णांच्या सेवांसाठी शासनामार्फत आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका दिल्या जाते परंतु मेळघाटसह जिल्ह्यातील ॲम्बुलन्स वैयक्तिक खरेदी बियर बार धाब्यासमोर दिसून लागल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची काळजी कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे दैनिक सुपर भारत ने केलेल्या स्टींग ऑपरेशन दरम्यान हा प्रकार उघडकीस आला वाढती लोकसंख्या त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्याचा भार वाढत आहे अनेक ठिकाणी वाढीव खाटा मंजूर करण्यात आले आहेत शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णाला तात्काळ सेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सोबतच अपघात स्थळे तात्काळ पोहोचण्याचे १०८आणी १०२ क्रमांकाच्या अतिरिक्त रुग्णवाहिका देण्यात आले आहेत रुग्णांना घेऊन पुढील जिल्हा किंवा तालुकास्तरावर निघणाऱ्

बनावट अपघात प्रकरणात संबंधितांची झाडाझडती सुरू!

Image
 बनावट अपघात प्रकरणात संबंधितांची झाडाझडती सुरू! ---------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर प्रतिनिधी अन्सार मुल्ला ---------------------------------------- कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथे एका अपघात प्रकरणात सी. आय. डी. मार्फत तपास सुरू आहे. या वादग्रस्त अपघातात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने तपास सुरू असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचे दिसून येते आहे.  वडगाव पोलीस ठाण्यात दाखल अपघातात बनवेगिरी केल्याचे स्पष्ट झाले असून तपासात समोर येणार असल्याचे खात्री दायक समजून येत आहे.    या बनावट अपघातात प्राथमिक माहिती नुसार हे प्रकरण ज्या लोकांनी दाखल केला त्यातील पाच लोकांवर प्राथमिक स्वरूपात गुन्हा नोंद असून त्यांची चांगलीच झाडाझडती सुरू आहे. हे बनावट  नुकसान भरपाईचे सम्पूर्ण प्रकरण कोल्हापूर येथील वकील नीलम एम. पोतदार यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले असून, विमा कंपनीला सदरच्या प्रकणात काही गोष्टी संशयास्पद आढळल्याने या प्रकरणाला वाचा फुटली पुढे या संदर्भात गुन्हा दाखल होऊन तपासाला सुरुवात झाली.  या बनावट अपघातात अजून काही लोका

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर.

Image
 बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर. ---------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र    मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ---------------------------------------- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत. रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती के

कन्हाळगाव सरपंच विनोद नवले राष्ट्रवादीची घड्याळ बांधणार ?

Image
 कन्हाळगाव सरपंच विनोद नवले राष्ट्रवादीची घड्याळ बांधणार ? ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र     मंगेश तिखट  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ------------------------------------- कोरपणा तालुक्यातील निवडणुका नुसताच पार पडल्या या निवडणुकीमध्ये तालुक्यातील भाजपा तालुका अध्यक्ष व काँग्रेस यांच्या विरोधात निवडणूक लढवून संपूर्ण सत्ता प्रस्थापित केली आता मात्र नवले यांचे पक्ष बदलण्याचे हालचाल सुरू झाली असून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार ? असल्याचे सर्वत्र चर्चेला उतआला आहे तेव्हा अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विनोद नवले यांच्याशी संपर्क करून आपल्या पक्षात त्यांना कसे खेचून आणता येईल याकडे सर्वच राजकीय पक्षांचे  लक्ष लागले आहेत तेव्हा विनोद नवले कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतील हे मात्र येणारी वेळ ठरणार आहे त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपले मत मांडत असताना एका चांगल्या राजकीय पक्षांचा आपण निर्णय घेऊ असे मत व्यक्त केलेत येणाऱ्या काही दिवसातच विनोद नवले एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची खमंग चर्चा आहे मागील पाच वर्षात नवले यांनी भाजप पक्षाचे सरपंच होते भ

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांचा सन्मान.

Image
 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांचा सन्मान. ----------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- 'समता पर्व’ अंतर्गत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम लातूर : संविधानाची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिन ते ६ डिसेंबर २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत ‘समता पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर पत्रकारासाठी कार्य शाळेचे तसेच पत्रकार बांधवांसाठी २९ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर पत्रकारासाठी जिल्हास्तरावर कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्राचे अध्यक्ष प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार,

निधन वार्ता.

Image
 निधन वार्ता. तारळे कुंभारवाडी येथील श्रीमती तुळसाबाई नामदेव कुंभार व.व.70 याचे वृधापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत कोल्हापूर वृत्तसेवा परीवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र थांबेना गांधीनगर पोलीस ठाण्याचे लोकसेवक करतात तरी काय.

Image
  गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र थांबेना गांधीनगर पोलीस ठाण्याचे लोकसेवक करतात तरी काय. ------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------ उचंगाव:-गाधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंचगाव रेल्वे ब्रिजच्या 110 मध्ये राहणाऱ्या सौ विद्या अमित बागडे याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी लाहन मुलांच्या दोन भिशी मधील अंदाजे 10,000 व आमित यांच्या पॅन्टच्या खिशातील दहा हजा रुपये तिजोरी मधील 35 हजार रुपये रोख व कानामधील सोने ची फुले पायातील पट्ट्या अंदाजे वजन पावणे दोन तोळे असा एकूण सव्वा लाखाचा रोख रकमेस मूद्देमाल चोरीला गेला इथून पुढे थोड्या अंतरावर  असलेल्या सुनील दुधाप्पा चौगुले यांच्या किराण मालाच्या दुकानातून दुकानात असलेले रोख हजार रुपये चोरट्याने चोरून नेले सदर घटणेची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे . गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार चोऱ्या होत असून या चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यास गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास  अपयश येत आहे मग वरिष्ठ पोलीस अधिकारी य

क्रांतीसुर्य थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले याची पुण्यतिथी साजरी!

Image
 क्रांतीसुर्य थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले याची पुण्यतिथी साजरी! ----------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- कोल्हापूर:-क्रांतीसुर्य सत्यशोधक थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त  कोल्हापूर बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन आचार्य   यांनी "सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोन्ही दाम्पत्यांना त्यांच्या कार्याचा आदर करून भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा" अशी मागणी केली यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन आचार्य युवा जिल्हाध्यक्ष आकाश कांबळे डॉक्टर रणजीत मिंचेकर अभिजीत कांबळे  राजवर्धनआचार्य श्याम कांबळे दगडू कांबळे आशुतोष करणे संदीप भोसले अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शासन महिला आघाडी इचलकरंजी वतीने आय डी एफ सी बँकेवर मोर्चा.

Image
 छत्रपती शासन महिला आघाडी इचलकरंजी वतीने आय डी एफ सी बँकेवर मोर्चा. ----------------------------------------------------------------------------------- -----------------------------------------------------------------------------------  कोल्हापूर:-जयसिंगपूर जवळील उदगाव येथील राणीताई कोळी व इतर दोन महिलांना आय डी एफ सी बँकेचे वसुली अधिकारी अनिल शशिराव पाटील, विजय कांबळे, चेतन कांबळे, राजवीर पाटील, स्नेहा भोसले यातील अनिल पाटील आयडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या राणीताई कोळी यांना अश्लील भाषेत असभ्य वर्तन करून मानसिक त्रास दिला या कारणावरून छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने कोल्हापूर एसटी स्टँड मार्गावर असलेल्या  आयडीएफसी शाखेच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी छत्रपती शासन महिला आघाडीच्या  विराट मोर्चा काढला होता मोर्चा नेतृत्व छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने दिव्याताई मगदूम. यांनी केले बँकेचे जनरल मॅनेजर यांनी या वसुली अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला या मोर्चामध्ये उदगाव मधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्राबाहेर पोहचलेली राष्ट्रीय संघटना.

Image
 लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्राबाहेर पोहचलेली राष्ट्रीय संघटना.  --------------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   स्वप्निल देशमुख ------------------------------------------------------------------------ विचारमंथन मेळाव्यात प्रा.डॉ.संतोष हूशे यांचे मनोगत पत्रकार स्वप्निल देशमुख बुलढाणा जिल्हाध्यक्ष नियुक्तीपत्र अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही कोरोना काळात अकोला येथून स्थापन झालेली राष्ट्रीय संघटना  अवघ्या १९ महिण्याच्या अल्पावधित महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आणि बिहारमध्येही सभासद नोंदणी करण्यात  यशस्वी झालेली बहूसंख्य वृत्तविद्या पदविकाधारकांची फौज बाळगणारी संघटना आहे.पत्रकार व सामाजिक प्रश्न,उपक्रमांसोबतच पत्रकार कल्याण योजनांचा पाठपूरावा,कोराना मदती,पत्रकार हल्ल्यांप्रकरणी गृहविभाग आणि पोलिसांकडून मागण्यांना मिळालेले प्रतिसाद,या सर्व कर्तव्य आणि समाजनिष्ठ यशस्वी वाटचालीचे संघटना खरोखरच राष्ट्रीय स्वरूपात साकारीत होण्यास सुरूवात झालेली आहे.असे वास्तव प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक,मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोष हुशे यांनी

कौतुक डाफळे लाल आखाडा केसरीचा मानकरी.

Image
  कौतुक डाफळे लाल  आखाडा केसरीचा मानकरी. --------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------- लाल आखाडा व्यायाम मंडळ मुरगूड यांच्या वतीने जिल्हा आणि राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने  आयोजित कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात अंतिम कुस्तीत आंतरराष्ट्रीय मल्ल आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता मल्ल कौतुक डाफळे याने एकेरी पट, दुहेरी पट व भारंदाज डावावर शशिकांत बोंगाडेंवर ११-०१ अशा गुणांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा लाल आखाडा केसरीचा बहुमान  पटकावला. खुल्या गटात मंडलिक साई आखाड्याचा मल्ल रोहन रंडे याने विजय डोईफोडे (मंडलिक साई आखाडा) याच्यावर झोळी व पट काढून चार गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला. ४६ वर्षांखालील लाल आखाडा कुमार केसरीचा बहुमान शाहू साखरचा सोहम कुंभार याने पटकाविला. त्याने प्रवण घारेवर (तिटवे) विजय मिळविला या गटामध्ये तृतीय क्रमांक सारंग पाटील आमशी यांनी पटकावला. ५७ किलो वजन गटातील युवा केसरी ची गदा अतुल चेचर याने अमोल साळवीविरुद्ध रोमहर्षक विजय प्राप्त करत मिळवली. या गटामध्ये अमोल बंगार्डे बानग

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून रतन बनसोडे यांना उमेदवारी जाहीर,

Image
 नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून रतन बनसोडे यांना उमेदवारी जाहीर, -------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------- विद्यार्थी, पदवीधर युवक, बेरोजगार आणि  वंचितांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य- रतन बनसोडे  नाशिक विधानसभा पदवीधर मतदारसंघाच्या होणा-या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून रतन बनसोडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. श्री रतन बनसोडे यांनी मंत्रालयात समाजकल्याण विभागातील नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागात अधिकारीपदावर काम केले आहे. या शिवाय त्यांनी अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यात समाजकल्याण विभाग समाजकल्याण अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच मुंबईत विभागीय जात पडताळणी समितीमध्ये श्री रतन बनसोडे यांनी उपायुक्त पदावर काम केले आहे आणि समाजकल्याण उपायुक्तपदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.  नाशिकमध्ये असताना तळागाळातील आणि वंचित गोरगरीब लोकांच्या विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. नाशिकमध्ये सर

बाल हक्क सप्ताह निम्मित बाल हक्क परिषदेचे आयोजन.

Image
 बाल हक्क सप्ताह निम्मित बाल हक्क परिषदेचे आयोजन. ---------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र. जितेंद्र गाडेकर. जालना चिफ ब्युरो. --------------------------------------------------- महिला  व बाल विकास कार्यालय ,  जिल्हा बाल संरक्षण कक्ष जालना व जिल्हा परिषद प्रशाला राणी ऊंचेगाव ता. घनसावंगी जिल्हा जालना यांच्या वतीने  जि प प्रशाला राणीउंचेगाव  ता. घनसावंगी जिल्हा जालना येथे बाल हकक अभियान सप्ताह अंतर्गत  बाल हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.   दि. 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान  देशभरात  बाल हक्क सप्ताह सर्वत्र साजरा करण्यात येतो.    जि प प्रशाला राणीउंचेगाव  ता. घनसावंगी जिल्हा जालना येथे बाल हकक अभियान सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांचे अधिकार , हक्क , कायदे व चाईल्ड हेल्पलाइन नंबर 1098 इत्यादी बद्दल मुलांना माहिती देण्यात आली. आजही समाजात स्त्रीभ्रूणहत्या ,  बालकामगार ,  बालविवाह ,  इत्यादी  समस्या समाजात आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी बालकांची जात , धर्म ,  वर्ण, वर्ग,  लिंग,  भाषा  यांचा विचार न करता जगातील प्रत्

राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धेत प्रेम जरपोतवार ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी!

Image
 राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धेत प्रेम जरपोतवार ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी! -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र          मंगेश तिखट  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी   ------------------------------------------ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट व नेहरू युवा केंद्र जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान महाराष्ट्र राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धा ही२०२१ मध्ये लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून शाळा, सामाजिक संस्था व वैयक्तिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. सदरहु स्पर्धेत संविधान दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे संयोजन व उत्तम सादरीकरण केल्याबदल सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडावार कॉलेज ऑफ सोशल चंद्रपूर येथील एम एस डब्ल्यू प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रेम नामदेव जरपोतवार याने द्वितीय क्रमांक पटकाविला. संविधान जागर स्पर्धा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  दि. २७ नोव्हेंबर २०२२ ला लुंबिनी बौद्ध विहार चामोर्शी येथे पार पडला . आयोजित या स्पर्धेत  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रेम  जरपोतवार या