माजी सैनिकांच्या समस्या मांडण्यासाठी संसदेत प्रतिनिधी हवा,.
---------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------सैनिकांनी देशसेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर ते समाजसेवा बजावत असतात समाजातील आणि माजी सैनिकांच्या समस्या मांडण्यासाठी संसदेत एखादा प्रतिनिधी असावा यासाठी राष्ट्रपती नियुक्त कोठ्यातून सदस्याची नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खास. धैर्यशील माने यांनी केले.
येथील अष्टविनायक सांस्कृतिक हॉल येथे रविवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्र राज्य सैनिक संघटना संलग्न शिरोळ तालुका सैनिक संघटनेतर्फे आयोजित सैनिक मेळाव्या प्रसंगी खास.माने बोलत होते.अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर माजी खास सुधीर सावंत होते.राज्य कार्याध्यक्ष नारायण अंकुशे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तुकाराम सूर्यवंशी,उपाध्यक्ष विजय पाटील,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय माने,रुपाली जुगळे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना ब्रिगेडियर सावंत म्हणाले सैनिक व माजी सैनिकांना आर्मी कॅन्टीन मधून मिळणाऱ्या सुविधा कुरियर प्रमाणे घरपोच देण्यासाठीची तरतूद केंद्र सरकारने केल्यास सीमेवर काम करत असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना कोणीतरी विचारणारा आहे.अशा पद्धतीची सहानुभूती कुटुंबीयांना मिळेल अनेक विविध मागण्यांसाठी शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेत माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.
यावेळी समीर खानोलकर,नारायण देसाई,गणपराव महाडिक आदींनी भाषणे केली.स्वागत तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण निर्मळे,प्रास्ताविक सल्लागार रमेश निर्मळे यांनी केले. यावेळी योगेश माळी सागर बदामे,अण्णाप्पा गायकवाड,
रामचंद्र बत्ते, नंदा खरात,वैशाली शिंदे,रुक्मिणी निर्मळे, प्रतिभा रजपूत आदि पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment