कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती खास.मंडलिक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती खास.मंडलिक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन .
----------------------------------------------------------------------------.jpeg)
---------------------------------------------------------------------------
येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रो.डॉ. ए .जी .मगदूम' यांच्या कागल तालुक्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती ' या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.ए.जी.मगदूम ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. टी. एम .पाटील ,कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष ,प्रा. संभाजी मोरे ,मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार ,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी होडगे, डॉ. एम. ए. कोळी, सदाशिव गिरीबुवा, सुनील कडाकणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर संशोधन ग्रंथ सहकारी सेवा पतसंस्थांना दिशादर्शक ठरेल .असा आशावाद खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांनी व्यक्त केला. सदर संशोधन ग्रंथाच्या लिखाणाबद्दल प्रा.डॉ. ए.जी.मगदूम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर लेखनासाठी प्राचार्य डॉ जयंत कळके, प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार, कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले.
Comments
Post a Comment