पेन्शन वाढीचा जीआर दाखविण्यास ते मुहूर्त पाहत आहेत काय?

 पेन्शन वाढीचा जीआर दाखविण्यास ते मुहूर्त पाहत आहेत काय?

राजे समरजितसिंह घाटगे

-----------------------------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------------------

संजय गांधी,श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची एक हजार रुपये वाढीव पेन्शन आपणच केल्याचे आमदार मुश्रीफसाहेब सातत्याने  सांगतात.याबाबत गेल्या एक महिन्यापासून त्यांच्या मंत्रीपदाच्या काळातील पेन्शनवाढीचा जीआर दाखविण्याबाबत आम्ही  जाहीरपणे विचारत आहोत .मात्र त्यांनी तो अद्याप दाखविलेला नाही.मुश्रीफसाहेब,तुमच्या मंत्री पदाच्या काळातील पेन्शन वाढीचा जीआर दाखविण्यास मुहूर्त बघत आहात काय? असा खोचक सवाल शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला.

   सुरुपली(ता.कागल) येथे प्रामाणिकपणे पीक कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानसाठीच्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल श्री. घाटगे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

    श्री. घाटगे  पुढे म्हणाले, संजय गांधी,श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची एक हजार रुपये वाढीव पेन्शन आपणच केल्याचे आमदार मुश्रीफसाहेब सातत्याने  सांगत आहेत.  २० ऑगस्ट २०१९ रोजी याबाबतचा जीआर समाज कल्याण विभागाने काढला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे पेन्शन वाढीचे खोटे श्रेय मुश्रीफ यांनी घेऊ नये.आता सुद्धा ते एक हजार रुपयांची  पेन्शन दोन हजार रुपये करणार असल्याचे सांगत आहेत. गेली अडीच वर्षे ते मंत्री होते त्यावेळी त्यांनी ती का केली नाही? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. मला एक वेळ आमदारकीची संधी द्या.मी ही पेन्शन वाढविल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले.

यावेळी सोमनाथ पाटील,रामदास पाटील,  यांनीही मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास दत्तामामा खराडे,प्रताप पाटील,अरुण शिंत्रे,सरपंच अनिल कांबळे,,वाय.एस.पाटील,दगडू शेणवी,निवृत्ती नाधवडेकर,एच.के.पाटील,नाना मोरे,श्रावण पाटील,संग्राम पाटील आदी उपस्थित होते.

आभार वाय.एस.पाटील यांनी मानले.

 छायाचित्र-सुरुपली ता.कागल येथे जाहीर सत्कार व बांधकाम कामगारांना साहित्य वाटपवेळी  शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह  घाटगे व इतर.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.