जयसिंगपूर,राजीवगांधीनगर , उदगाव परिसरात निधी बँकेच्या नावाने खाजगी सावकारकीचे जुगाड जोरात खाजगी सावकारकीने गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल ब्लॅक मनी लपवण्यासाठी कथित व्यक्तीनी काढले निधी बँक.

 जयसिंगपूर,राजीवगांधीनगर , उदगाव परिसरात निधी बँकेच्या नावाने खाजगी सावकारकीचे जुगाड जोरात खाजगी सावकारकीने गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल ब्लॅक मनी लपवण्यासाठी कथित व्यक्तीनी काढले निधी बँक.

-----------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
 -----------------------------------------------------------------------

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे जयसिंगपूर शहर आणि परिसरातील सर्वच घटकातील आर्थिक गणित कोलमडले आहे. यातून अनेकांनी 10 ते 15 पासून 25  टक्क्यांपर्यंत व्याजाचे धंदे जीवनाचा गाडा चालवण्याचा प्रयत्न केला होता आणि सुरु आहे.आता या निधी बँकेच्या नावाने खाजगी सावकारकी वसुलीसाठी तगादा लावला आहे.    कोरोनामुळे नोकरी, व्यवसायापासून वंचित राहिलेल्यांना एकाचे कर्ज भागवण्यासाठी दुसऱ्या सावकाराचे कर्ज काढावे लागत असल्याचे चित्र आहे.काही खंडणी बहाद्दरांनी आपला अवैध काळा पैसा लपवण्यासाठी नवी शक्कल लढवली. सामाजिक कार्यकर्ते व कथित व्यक्तीनी

मिळून आपले खाजगी सावकारकीची एक निधी बँकेच  चालू केली. त्या निधी बँकेत

आज पर्यंत कर्जवाटप झालीच नाही. फक्त त्या ठिकाणी गरजुनां व अवैध व्यावसाय करणाऱ्या व्यक्तींना दहा ते पंधरा टक्क्याच्या व्याजाने रक्कम दिले जात आहे.

आणि व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी  गावगुंड व पोलीस प्रशासनाची धाक दाखवली जाते. मात्र या प्रकारात पोलिसांची कोणतीच भूमिका नसते तर पोलिसांचे नाव सांगून मोठी रक्कम व्याजाच्या स्वरूपात उखळळी जात आहे. 

व व्याजाची रक्कम वेळेवर नाही दिल्यास त्या व्यक्तींना  धमकी दिली जाते. तर पोलिसांनी उदगाव राजीव गांधी नगर जयसिंगपूर व शाहूनगर परिसरात गोपनीय पद्धतीने माहिती काढून या ब्लॅक मनीचा "नाळ" कोठे कोठे आहे हे शोधून काढावी.त्यांच्यावर कडक कारवाई करावी. ब्लॅक मनी वाईट करण्यासाठी काढलेल्या निधी बँकेत स्वतःच संचालक व्हायचे चेअरमन व्हायचे आणि गावात वाईट कॉलर म्हणून मिरवायचे हा धंदा सध्या ते टिकलीचोर आणि चारचौघात स्वतःला स्वाभिमान समजणारे पद भोगत आहेत.

दरम्यान दिलेल्या रकमेचे व्याज वेळेवर न दिल्यास पैशाच्या व व्याजाच्या मोबदल्यात सर्वसामान्य गरीब नागरिकांचे घर,, सोन, वाहने कमी काढून घेतले जातात नंतर तेच मुद्देमाल कमी किमतीत काढून घेतलेली उदाहरणे जयसिंगपुरात घड़लेली आहेत. या ब्लॅक मनी वाईट करणाऱ्या वाईट कॉलरच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी टोकाचे पाऊलही उचलली आहेत. मात्र इज्जतीला घाबरून ते लोक शांत आहेत. याकडे कोल्हापूरजिल्हा पोलीस प्रमुख, यासह अप्पर पोलीस अधीक्षक आणि जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस प्रशासन लक्ष गालणार का ? याचे उत्तर सामान्य नागरिक व जनता मागत आहे.. तसेच त्या तथाकथित निधी बँकेची संपूर्ण माहिती त्याची संचालक बॉडी निधी बँकेतील ठेवी दिलेल्या कर्जाची यादी याचा लेखाजोखा वरिष्ठ पातळीवर तपासावा अशी ही मागणी सध्या त्या मुकुट खेळणाऱ्या गावातून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.